Red light area 
सोलापूर

आता देहविक्रीवरही होतोय "कोरोना'चा परिणाम

अशोक मुरूमकर

सोलापूर : जगभर हातपाय पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा देहविक्रीवर परिणाम झाला आहे. "कोरोना'च्या भीतीने ग्राहक येत नसल्याचे वारांगना सांगत आहेत.

कोरोना व्हायरसची भीती
"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, उत्सवांवर बंदी घातली आहे. याचा परिणाम राज्यातील अनेक व्यवसायांवर झाला आहे. अतिशय वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसची भीती ग्रामीण भागातही निर्माण झाली आहे. पोल्ट्री व्यवसाय, मंगल कार्यालये, लग्न समारंभ, उत्सवांसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर "कोरोना'चा परिणाम जाणवत आहे. त्यातच आता देहविक्रीच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. मात्र, याबाबत समोर येऊन कोणीही थेट बोलायला तयार नाही. देहविक्री करणाऱ्या वारांगनाकडे कोठूनही आलेले ग्राहक असतात. शरीराची भूक भागवण्यासाठीही आता "ते' पुरुष जात नसल्याचे समोर आले आहे.

कोण कुठून व काय आजार घेऊन येतो माहीत नसते
देहविक्री चालणाऱ्या काही ठिकाणी "सकाळ'ने मंगळवारी (ता. 17) चाचपणी केली. तेव्हा व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. एका देहविक्री करणाऱ्या महिलेने सांगितले, की आमचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे. कोणाला कसला आजार आहे, हे आम्हाला माहीत नसते. आम्ही त्याच्याकडे कधी विचारणाही करत नाही. जो कोण असेल तो आमचा ग्राहकच. मात्र, याचा काही दिवसांपासून परिणाम जाणवत आहे.

देहविक्री व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर
शरीराची भूक भागवण्यासाठी येणाऱ्यांचा कधी वेळ नसतो. कोण कधी येईल याचे काही सांगता येत नाही. मात्र, कोरोना व्हायरसची जेव्हापासून तीव्रता वाढली आहे तेव्हापासून येणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. येथे येणारे कोठून येतात हे सांगता येत नाही. देहविक्री करणाऱ्या महिलेशी अनेकांची जवळीक आलेली असते. त्या भीतीतून ग्राहक येत नसेल असं वाटतं, असं एकाने सांगितले. "कोरोना'बाबत घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घ्यायला पाहिजे. "कोरोना'मुळे अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. देहविक्री हा एक व्यवसाय वाटत असला तरी यावर अनेकजणांचे कुटुंब अवलंबून असते, त्यावर याचा परिणाम होत आहे, असेही तेथील एकाने "सकाळ'शी बोलताना सांगितले. याबाबत एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनीही परिणाम झाला असल्याचे सांगत स्पष्ट बोलण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Thane News: डोंबिवली सर्पदंश प्रकरण; डॉ. संजय जाधव निलंबित, पालिका आयुक्तांकडून मोठी कारवाई

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Kannad Accident : तेलवाडीजवळ दुचाकीला पिकअपचा अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : मंचर येथून परांडा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी किराणा साहित्याचे दोन ट्रक रवाना

SCROLL FOR NEXT