सोलापूर

कोरोना : `या` महापालिकेत प्रवेशबंदी

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी शहरात सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींव्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ज्या लोकांचे काम आहे अशा लोकांनाच त्यांच्याकडील कागदपत्रे पाहून सोडले जात आहे. दरम्यान, गर्दी थांबविण्यासाठी जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची कार्यवाही 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात रोज सरासरी हजार दाखल्यांची मागणी होत आहे. आतापर्यंत अंदाजे 30 हजार दाखल्यांची मागणी करण्यात आली आहे. दाखल्यांसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याच्या शक्‍यतेने कर्मचाऱ्यांनी काम बंद केले होते, त्यामुळे येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे नऊ हजार दाखल्यांचे वाटप झाले आहे. 

नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आल्यानंतर दाखले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लोकांची वाढती गर्दी पाहता या ठिकाणी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्यामुळे दाखले देण्यातील अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे. मात्र दाखल्यांसाठी वाढत चाललेली गर्दी पाहता हे चित्र आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी गुरुवारी सकाळी अचानकपणे दाखला वितरण कार्यालयास भेट दिली आणि पाहणी केली. दाखला देण्यासाठी जी तारीख नागरिकांना देण्यात आली आहे, त्या तारखेला दाखला मिळालाच पाहिजे, अशा सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले होते. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तामध्ये एका वेळी चारच नागरिक आत सोडले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही काम करण्यास सोपे जात आहे. दरम्यान गर्दीच्या कारणामुळे दाखले बंद देण्याचे काम स्थगित करण्याचा आदेश गुरुवारी दुपारी काढण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारूने मृत्यूआधी दृष्टी अधू झाली, तोंडाला फेस आला; आतापर्यंत २१ मृत्यू, २२ अधिकाऱ्यांचे निलंबन

Ebola Virus: इबोला व्हायरसचा उद्रेक! ९०० हून अधिक जणांना संसर्ग, २२३ रुग्णांचा मृत्यू; नवीन स्ट्रेन किती धोकादायक?

Mumbai: ब्रेकऐवजी एक्सिलरेटरवर पाय, कारखाली चिरडून महिलेसह चिमुकल्याचा मृत्यू; मुंबईत भीषण अपघात

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

SCROLL FOR NEXT