सोलापूर

कोरोना : आजूनही चारचाकी गाड्या रस्त्यावरच 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सध्या शहरात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर प्रार्दुभाव वाढल्याने नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये यासाठी पोलिस विभागाने चारचाकी व दुचाकी गाड्या वापरण्यास मनाई केली आहे. मात्र, आजही शहरात सकाळच्या वेळेस अनेक चारचाकी गाड्या आणि दुचाकी रस्त्यावर फिरतानाचे चित्र पहायला मिळते. मात्र, या आत्यवश्‍क सेवेतील चारचाकी व दुचाकी गाड्यांना सुट देण्यात आली आहे. 

अनेक जण गाड्यांवर फिरताना 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सोलापूर लॉकडाऊन आहे; मात्र रोज काही तास जीवनाश्‍वक वस्तू घेण्यासाठी पोलिस विभागाने वेळ दिला आहे. या वेळी सर्रास पणे अनेक जण गाड्यांवर फिरताना दिसत आसल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागात नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने भाजीपाला विक्रीसाठी सोय केली आहे. या ठिकाणी महापालिकेकडून व पोलिसांकडून नागरिकांनी व विक्रेत्यांनी सामाजिक आंतर राखावे आसे अवाहन केले आहे. त्याप्रमाणे काही ठिकाणी राखले जात आहे. तर, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याचबरोबर औषधांच्या दुकानात औषधे खरेदीसाठी मोठ्या रांगा लागत आसल्याचे चित्र दिसत आहे. 


चारचाकीमध्ये दोन व्यक्तींना परवानगी 
ज्यांच्याकडे आत्यवश्‍क सेवेचा पास आहेत त्यांच्याच चारचाकी गाड्या सध्या रस्त्यावर आहेत. आजपर्यंत 200 डबलसिट जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अत्यावश्‍क सेवेतील चारचाकीमध्ये फक्त दोन व्यक्तींना बसण्यास परवानगी देण्यात आली. 
- डॉ. वैशाली कडूकर, 
पोलिस उपायुक्त  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT