002Child_Mask_0_2.jpg 
सोलापूर

बार्शी, करमाळा, माढा, पंढरपूरमध्ये वाढतोय कोरोना ! ग्रामीणमध्ये आज 118 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागातील बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्‍यात पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. आज तीन हजार 34 संशयितांमध्ये 118 पॉझिटिव्ह आढळले असून मोटेवाडी (ता. माळशिरस) आणि मंगळवेढा (ता. होनमाने गल्ली) येथील दोन को-मॉर्बिड रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आता दोन हजारांच्या उंबरठ्यावर असून वाढती रूग्णसंख्या चिंतेत भर टाकणारी आहे.

ठळक बाबी... 

  • 14 दिवसांत जिल्ह्यात वाढले कोरोनाचे एक हजार 33 रुग्ण 
  • ग्रामीण भागातील 15 रुग्णांचा कोरोनाने घेतला 14 दिवसांत बळी 
  • बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्‍यांत सर्वाधिक वाढले रूग्ण 
  • आज तीन हजार 34 संशयितांमध्ये 118 पॉझिटिव्ह तर दोन पुरुषांचा मृत्यू 
  • 7 आणि 9 मार्च रोजी दवाखान्यात उपचारासाठी दाखल रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • मृतांची संख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर; 850 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

मार्च महिन्यात जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये एक हजारांहून अधिक रूग्ण आढळले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 ते 14 मार्च या काळात अक्‍कलकोट तालुक्‍यात 26, बार्शीत 176, करमाळ्यात 157, माढ्यात 161, माळशिरसमध्ये 188, पंढरपुरात 143, मंगळवेढ्यात 36, मोहोळमध्ये 52, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 12, सांगोल्यात 53 आणि दक्षिण सोलापूरात 29 रुग्ण वाढले आहेत. संशयित रुग्णांनी वेळेत उपचार घ्यावेत, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता असे नियम पाळावेत, असे आवाहन करूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागात लक्षणीय आहे. दंड करूनही त्यांच्याकडे तेवढे पैसे नसल्याने पोलिसांना कारवाई करतानाही मर्यादा येऊ लागल्या आहेत. तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परंतु, नागरिकांनी कोरोनाविरुध्दची लढाई जिंकण्यासाठी स्वत:बरोबरच स्वत:चे कुटुंबही सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT