Bajar 
सोलापूर

कोरोनाचे सावट ! सजावट, पूजा साहित्य खरेदीत दिसतेय भाविकांची उदासीनता

अरविंद मोटे

सोलापूर : श्रीगणेशाची स्थापना होताच गृहिणींना गौरीपूजनाचे (महालक्ष्मी) वेध लागतात. दरवर्षी गौरी-गणपतीच्या सणासाठी बाजारात सजावट साहित्य, पूजेच्या साहित्याची रेलचेल असते. मात्र यंदा बाजारात मंदी असून, साहित्य खरेदीत उदासीनता दिसून येत आहे. 

शहरातील टिळक चौक, कोंतम चौक, कन्ना चौक या परिसरात तसेच अलीकडे डी मार्ट शेजारी मोठ्या प्रमाणात सजावट साहित्याची दुकाने लागली आहेत. मात्र यंदा कोरोनामुळे बाजारात मंदी असून सजावट साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी आहे. याबाबत काही विक्रेत्यांशी संवाद साधला असता, यंदा ग्राहक पैसे खर्च करायला तयार नाहीत. मुळात इंधन दरवाढ व इतर कारणांमुळे सजावट साहित्याचे दर 10 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. लोकांच्या हाताला काम नसल्याने व उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्यामुळे बाजारात मंदी असल्याचे त्यांनी सांगितले. 

सजावट साहित्यांसह गुलाल, अर्गजा, कापूर, उदबत्ती, पूजेचे साहित्य विक्रीवर कोरोनाचा परिणाम झाला असून, ग्राहकांचा कल कमी पैशात यंदाच्या उत्सवाचा खर्च भागवण्याकडे आहे. ग्राहक संदीप अमृतसागर यांनी सांगीतले, की यंदा चिनी माल आम्ही खरेदी केला नाही. महाग असला तरी स्वदेशी वस्तूच खरेदी केल्या. 

मधला मारुती येथील विक्रेते सिद्धू आवटे म्हणाले, माझा पूजा साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. लॉकडाउनमुळे मालाला उठाव नाही. 50 टक्के ग्राहक कमी झाले आहेत. लॉकडाउनमुळे कामगार कपात झाल्याने, इंधन महागल्याने होलसेल विक्रत्यांनीच दर वाढवले आहेत. तशातच यंदा मंडळाचे गणपती नाहीत. आमचा सर्वांत मोठा ग्राहक सार्वजनिक मंडळांचे गणपती हा असतो. मात्र, यंदा सार्वजनिक गणपती नसल्याने ग्राहकच नाहीत. 

अजय गांधी म्हणाले, माझा सजावट साहित्य, दागिने व हार विक्रीचा व्यवसाय आहे. वाहतूक व्यवस्था उशिरा सुरू झाल्यामुळे यंदा ग्रामीण भागातून ग्राहकच आला नाही. बाजारात अतिशय मंदी आहे. रविवारी बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय उशिरा झाला. अनेकांना रविवारी बाजार सुरू आहे याची माहिती नाही. असे निर्णय योग्य वेळी घेणे आवश्‍यक आहे. शिवाय सायंकाळी सातऐवजी सणावाराला तरी रात्री नऊपर्यंत दुकाने सुरू ठेवता यायला हवीत. 

गणेश शॉपिंग सेंटर येथील विक्रेता अशोक गुलेच्छा म्हणाले, मी लायटिंग व डेकोरेशनचे साहित्य विकतो. बाजार खूपच थंड आहे. तशातच चायना माल बंद आहे. स्वदेशी मालाची विक्री सुरू आहे. इलेक्‍ट्रिक साहित्यात यंदा 10 टक्के दरवाढ झाली आहे. 

ग्राहक सागर सोनेगार म्हणाले, घरी गौरी-गणपती दोन्ही आहे. मात्र, कोरोनामुळे मागील पाच महिन्यांपासून हाताला काम नाही. त्यामुळे सणवाराच्या उत्साहाला आवर घालावी लागत आहे. मनासारखा खर्च करता येत नाही. 

स्वाती अमृतसागर म्हणाल्या. पूर्वी घरातील चार-पाच जण कमावते होते. कोरोनामुळे आता एकच कमावतो. तशातच सजावट साहित्याचे दरही वाढले. मनासारखे साहित्य बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे खर्च करता येत नाही. कमीत कमी खर्चात यंदाचा सण साजरा करावा लागणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT