Moog 
सोलापूर

माणसांवर कोरोनाचा तर मुगाच्या पिकावर "या' विषाणूचा विळखा..! जिल्ह्यातील 22 हजार हेक्‍टर क्षेत्राला फटका 

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत माणसांना कोरोना विषाणूचा धोका वाढला असताना महत्त्वाच्या मूग पिकावर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात पिवळ्या विषाणूचा (एलो मॉजॅक) विळखा पडला आहे. दोन्ही विषाणू वेगळे असले तरी या विषाणूंचा मोठा फटका मनुष्यप्राणी व मूग पिकाला बसला आहे. पिवळ्या विषाणुमुळे जिल्ह्यातील सुमारे 22 हजार 263 हेक्‍टर मुगाचे क्षेत्र बाधित झाले आहे. 

कोरडवाहू सोलापूर जिल्ह्याची तशी रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असली, तरी यंदा जिल्ह्यात वेळेत आणि समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. सरासरी क्षेत्रापेक्षा पेरणी क्षेत्र तब्बल एक लाख 31 हजार 469 हेक्‍टरने वाढले आहे. यामध्ये मुगाची पेरणी 22 हजार 263 हेक्‍टर क्षेत्रावर झाली. मुगाच्या पेरणी क्षेत्रातही यंदा आठ हजार 613 हेक्‍टरने वाढ झाली आहे. मात्र मुगाच्या पिकावर फुले येण्याच्या अवस्थेतच पिवळ्या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. अचानक आलेल्या या परिस्थितीचा सर्वच शेतकरी सामना करू शकले नाहीत. पिवळ्या विषाणूचा मुगावर प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनियमित आकाराने या विषाणूची वाढ होत आहे. त्यामुळे प्रकाश संष्लेशणाची क्रिया बंद पडून मुगाची पाने जागेवरच वाळून गेली. तर अशा परिस्थितीत तग धरलेल्या मुगाला शेंगा कमी लागल्या. काही भागात मात्र मुगाचे प्लॉट शेतकऱ्यांना सोडून द्यावे लागले आहेत. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडूनही मुगाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. 

याबाबत सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. समाधान जवळगे म्हणाले, मुगावर यंदा पिवळ्या विषाणूचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. खरेतर या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. त्याच्या नियंत्रणासाठी डायमिथॉएट 500 मिली 500 लिटर पाण्यातून प्रतिहेक्‍टरी फवारावे. 

मोडनिंबचे शेतकरी वैभव सुर्वे म्हणाले, आमच्या मुगाची पाने पिवळी पडली आहेत. आता मुगाची काढणी सुरू केलीय, मात्र त्याच्या शेंगाच पोसल्या नाहीत. शेंगात दाणे भरले नसल्यामुळे पोकळ शेंगा झाल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी भक्तांसाठी अनोखी सेवा; भिवंडीत तब्बल एक लाख वडापावचे मोफत वाटप

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT