medical officers 
सोलापूर

कोरोनाच्या विळख्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण ! रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज

मनोज गायकवाड

श्रीपूर (सोलापूर) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य विभागाला अपुऱ्या कुशल मनुष्यबळाचे ग्रहण लागले आहे. वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी, संभाव्य परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आणि बाधितांच्या उपचारासाठी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरणे गरजेचे आहे. ट्रेसिग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करार संपलेल्या अधिकाऱ्यांच्या नव्या कराराची प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. 

कोरोना संसर्गाचा वेग वाढल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक केले आहेत. ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देऊन कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर लसीकरणाच्या कामालाही गती दिली जात आहे. संसर्गाचा वेग वाढल्यामुळे आरोग्य विभागावरचा ताण वाढला आहे. 

जिल्ह्यात 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. एका केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी या निकषानुसार जिल्ह्यात 154 वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्‍यकता आहे. त्यापैकी 92 ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. या 92 पैकी 70 ठिकाणी करार पद्धतीने नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत तर, साधारणतः 22 ठिकाणी जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचा वेग वाढल्यावर 22 ठिकाणी 11 महिन्यांसाठी वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले होते. या अधिकाऱ्यांचा करार कालावधी संपल्यावर त्यांचे करार पुन्हा नियमित केलेले नाहीत. त्यामुळे या 22 जागा रिक्त आहेत. 

कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेला खऱ्या अर्थाने बळ द्यायचे असेल तर, करार संपलेल्या या 22 जागांवर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. त्यामुळे, आरोग्य विभागासह बाधित रुग्णांना देखील दिलासा मिळायला मदत होणार आहे. 

22 ठिकाणी नियुक्तीची गरज 
जिल्ह्यातील 22 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 11 महिन्यांचे करार साधारणतः चार महिन्यांपासून संपले आहेत. नवीन करारासाठी त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्ज सादर केले आहेत. परंतु, अद्याप नवीन करार करून त्यांना सेवेत सामावून घेतलेले नाही. पंढरपूर- मंगळवेढा येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेचा त्यात अडसर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनाची स्थिती आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी संपलेले करार लक्षात घेता, आचारसंहितेचे कारण कितपत योग्य आहे, हा देखील प्रश्‍न आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन सांगली, सातारा, नगर या जिल्ह्यात करार संपलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना चार दिवसांनंतर लगेच नवीन करार करून सेवेत सामावून घेतले आहे. याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यात देखील कार्यवाही होण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. 

माळशिरस तालुक्‍याची स्थिती गंभीर 
जिल्ह्यात 22 ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असून त्यात माळशिरस तालुक्‍यातील माळशिरस, मोरोची, फोंडशिरस, माणकी, शंकरनगर, बोरगाव आणि महाळुंग या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT