Gambling 
सोलापूर

धक्कादायक ! जुगाऱ्यांमुळे वाढतोय "या' गावात कोरोनाचा संसर्ग 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : साडेआठ हजार लोकसंख्या असलेल्या मंगळवेढा तालुक्‍यातील लक्ष्मी दहिवडीत जुगार खेळणाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात खळबळ उडाली असून, सध्या कोरोना रुग्णांची संख्या 26 झाली आहे. 

लक्ष्मी दहिवडी गावामध्ये जुगार, दारू विक्री असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत आहेत. लॉकडाउन व कोरोनाच्या काळात हे अवैध धंदे सुरूच आहेत. अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू असून, शेजारच्या गावातील नागरिकही पत्ते खेळण्यास येत आहेत. त्या गावातही एकजण कोरोना पॉझिटिव्ह सापडला. सुरवातीला या पत्ते खेळणाऱ्यांमधील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामस्तरीय समितीने सर्वांचे गावातील शाळेत विलगीकरण केले. त्या वेळी त्यांचीही चाचणी केली असता त्या सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाची लागण होऊ शकते, यासाठी प्रशासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करण्यासाठी गावात येऊन स्वॅब घेण्याचे नियोजन केले. मात्र, त्यांनी कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे लक्ष्मी दहिवडीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट घेण्यास आरोग्य प्रशासनही हतबल झाले असून, पोलिस प्रशासनावर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. 

गावात सहा रुग्ण सापडल्यामुळे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांनीही दुकान उघडत गावात धान्य वाटप केले असून, त्यामध्ये एक दुकानदारही पॉझिटिव्ह आला. त्या दुकानदाराने सुमारे 150 लोकांना रेशनचे धान्य वाटप केल्याची चर्चा असून, आता हे पॉझिटिव्ह रुग्ण किती कुटुंबांना बाधित करणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. शाळेत विलगीकरण केलेल्यांनी कोव्हिड सेंटरमध्ये जाण्यास नकार देत प्रशासनाशी हुज्जत घालून "आमच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करायची नाही", असा हट्ट धरत "हाय रिस्क, लो रिस्क' संपर्कातील लोकांची नावे देण्यास नकार दिला. आमचेच रिपोर्ट प्रशासनाने खोटे दिले असल्याचा आरोप प्रशासनावर करत दिवसभर ग्रामस्तरीय समितीसोबत त्या रुग्णांनी हुज्जत घालत आरोग्य विभागाला दिवसभर गावात ताटकळत ठेवले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांची धाड; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT