सोलापूर

सोलापूर महापालिकेतील अधिकाऱ्यास कोरोनाची लागण

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कात व कार्यालयातील कर्मचारी व शिपायांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

एका नगरसेविकाचा पती कोरोना पाॅझिटीव्ह आला होता. हा पती काही दिवसांपूर्वी त्या अधिकाऱ्यास प्रभागातील कामानिमित्त बोलण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे ज्या दिवशी हा पती या अधिकाऱ्यास भेटला, त्याच दिवशी पतीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते व त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  बुधवारी सायंकाळी 5 आज गुरुवारी सकाळी 8 या 15 तासांमध्ये तब्बल 42 नवीन रुग्ण आढळले आहेत. या नवीन  रुग्णांमध्ये  17 पुरुष व 25 महिलांचा समावेश आहे. एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यूही आज सकाळी आठ वाजेपर्यंत झाला आहे.

आज गुरुवारी सकाळच्या अहवालानुसार कोरोनामुळे सोलापुरातील मृत पावलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 67 झाली आहे. सोलापुरातील सहा हजार 289 जणांची  आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 5,580 आले आहेत. 709 पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या 311 जणांना घरी सोडण्यात आले आहे.


सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही संख्या कधी आटोक्यात येणार? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 12 एप्रिल पर्यंत कोरोना मुक्त असलेले सोलापूर अचानक कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस विभाग सोलापुरातील कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. दैनंदिन वाढत चाललेल्या रुग्णसंख्या संख्येमुळे सोलापूरमध्ये संभ्रमाचे व भितीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT