31Corona_20akola_2001_1_3.jpg 
सोलापूर

सोलापूरकरांच्या सतर्कतेमुळे थांबतोय कोरोनाचा संसर्ग ! आज 493 संशयितांमध्ये अवघे नऊ पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असून काही शहरांमधील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मात्र, सोलापुकरांच्या सतर्कतेमुळे आणि नियमांचे पालन केल्याने शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. आज शहरातील 493 संशयितांमध्ये नऊ रुग्ण आढळले आहेत.

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 27 हजार 143 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 541 कोरोना बाधित रुग्ण 
  • एकूण रुग्णांपैकी नऊ हजार 555 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • शहरात सध्या उरले 414 रुग्ण; आज एकाचा झाला मृत्यू 
  • सोलापुकरांनी नियमांचे केले पालन; दुसऱ्यालाटेची शक्‍यता तरीही रुग्ण होताहेत कमी 
  • आज 493 संशयितांमध्ये आढळले अवघे नऊ पॉझिटिव्ह; 48 वर्षीय महिलेचा मृत्यू 

शहरात आज बसवेश्‍वर नगर (एमआयडीसी रोड), बॉईज हॉस्टेल, आसरा चौक (होटगी रोड), पश्‍चिम मंगळवार पेठ, महालक्ष्मी नगर (विजयपूर रोड), भगवंत हौसिंग सोसायटी, नाकोडा रेसिडेन्सी (बुधवार पेठ), कन्नी नगर (दहिटणे) आणि अवंती नगरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रुग्णांच्या संपर्कातील 134 संशयित होम क्‍वारंटाईन असून 30 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 29 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून आता संशयितांनी वेळेत उपचार घ्यावेत, जेणेकरुन कोणताही रुग्ण कोरोनाचा बळी ठरणार नाही, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दीत विनाकारण जाणे टाळावे, हात नियमित स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क हनुवटीवर न ठेवता तो स्वच्छ करुन पुन्हा वापरावा असेही आवाहन महापालिकेतर्फे वारंवार केले जात आहे. त्यानुसार नागरिकांनी नियमित पालन केल्याने संसर्ग कमी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

SCROLL FOR NEXT