KUTUMB 
सोलापूर

"माझे कुटुंब माझी जबाबदारी' : मोहोळ तालुक्‍यात झाली एक लाख नागरिकांची तपासणी 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत मोहोळ तालुक्‍यात दीडशे पथकांच्या माध्यमातून एक लाख नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी किरकोळ आजार असलेल्या 147 व्यक्ती आढळल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर यांनी दिली. 

15 सप्टेंबरपासून तालुक्‍यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला होता. तालुक्‍यात एकूण 104 गावे असून, 94 ग्रामपंचायती आहेत. तर 66 हजार 707 कुटुंबे असून त्यांची लोकसंख्या तीन लाख आहे. मोहोळ तालुक्‍यात सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे तर मृत्यू होण्याच्या प्रमाणात तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

तपासणीसाठी ग्रामीण भागासाठी 133 पथके तैनात केली असून शहरासाठी 17 पथके तयार करण्यात आली आहेत. आजपर्यंत 19 हजार 374 कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे. तालुक्‍यात कोमॉर्बिड व्यक्ती तीन हजार 170 आहेत, साठ वर्षांवरील सात हजार 870 व्यक्ती आहेत. ऑक्‍सिजन लेव्हल व तापमान या दोन्ही बाबी तपासणीवर पथकाचा भर आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर 12 ते 24 ऑक्‍टोबर अशा दोन टप्प्यांत ही तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी तपासणीसाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पात्रुडकर यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

SCROLL FOR NEXT