सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात एकाच दिवशी कोरोनाने घेतला नऊ जणांचा बळी 

संतोष सिरसट

सोलापूर ः कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 57 एवढी झाली आहे. आज ग्रामीण भागात एकूण 146 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार 421 एवढी झाली आहे. 

आज मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्‍यातील आठ जणांचा समावेश आहे. बार्शीतील 48 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, वैराग येथील 38 वर्षीय पुरुष, मुंगशी (आर) येथील 63 वर्षीय पुरुष, भवानीपेठेतील 75 वर्षीय पुरुष, नांदणी येथील 70 वर्षीय महिला, सासुरे येथील 65 वर्षीय पुरुष, बारंगुळे प्लॉट येथील 60 वर्षीय पुरुष तर करमाळ्यातील शिवाजीनगर येथील 52 वर्षीय पुरुष यांचा आज मृत्यू झाला. 

अक्कलकोट येथील भारतगल्लीत एक, बुधवारपेठेत दोन, फत्तेसिंह चौकात तीन, खासबागेत तीन, मेनरोड परिसरात दोन, उत्कर्षनगरात एक, तालुक्‍यातील बोरगावात तीन, चुंगीत दोन, हिरनळ्ळी, नावंदगी, सुलेरजवळगे, वागदरी येथे प्रत्येकी एक, करमाळ्यातील वेताळ पेठेत एक, तालुक्‍यातील आळसुंदे येथे चार, घोटी येथे एक, सालसे येथे चार, वरकुटे येथे, माढा तालुक्‍यातील भोसेत एक, उपळाई खुर्द येथे एक, अकोले खुर्द येथे एक, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज येथे एक, नातेपुते येथे तीन, सदाशिवनगरात एक, वेळापुरात एक रुग्ण सापडला. मोहोळ येथील बाजारतळ येथे एक, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बीबी दारफळ येथे 11, नान्नज, पडसाळी, तिऱ्हे येथे प्रत्येकी एक, पंढरपुरातील गांधी रोड येथे सात, हनुमान मैदान येथे एक, कलिकादेवी चौकात एक, लिंकरोड येथे एक, मनीषानगरात चार, नाथ चौकात तीन, तालुक्‍यातील कौठाळी येथे एक रुग्ण आढळला. सांगोला तालुक्‍यातील जुनोनी, बलवडी येथे प्रत्येकी एक, जवळा येथे सहा रुग्ण आढलले. दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथे पाच, वांगीत एक रुग्ण आढळला. बार्शीतील अलिपूर रोड, बगले चाळ, भवानीमंदिर पाठीमागे, गवसने प्लॉट, हांडे गल्ली, जवळे प्लॉट, ख्वाजानगर झोपडपट्टी, माळी प्लॉट, पाटील चाळ, सोलापूर रोड, सावळे गल्ली, उपळाई रोड येथे प्रत्येकी एक, हिरेमठ प्लॉट येथे तीन, कुर्डुवाडी रोड परिसरात दोन, राऊत चाळ येथे चार, सलगरगल्ली येथे दोन तर तालुक्‍यातील देवगाव, कुसळंब, नांदणी, नारीवाडी येथे प्रत्येकी एक, अरणगाव येथे पाच, जामगाव येथे 14, पानगाव येथे दोन, वैराग येथे चार रुग्ण आढळून आले. 



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Paithan News : केकत जळगावमध्ये ग्रामस्थांची सतर्कता कामी आली; महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला!

Jalgaon News : थंडीचा कडाका अन् मेथीच्या लाडूंचा तडका! जळगावात घराघरांत दरवळला पारंपरिक स्वाद

IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल

SCROLL FOR NEXT