सोलापूर

अरे व्वा... शेतकऱ्यांना मार्गदर्शन.... कसे

राजाराम ल. कानतोडे

सोलापूर  ः सोलापूर कृषी विज्ञान केंद्रमार्फत झूम कॉन्फरन्सद्वारे चार गावांतील शेतकऱ्यांना सोमवारी नावीन्यपूर्ण पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. 

लॉकडाउनने शेतकऱ्यांच्या बांधावर जाता येत नसले तरी सोलापूर कृषी विज्ञान केंद्रने या समस्येवर मात केली आहे. कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून झूम व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याची सुरवात सोमवारी (ता. 13) झाली. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील निंबर्गी, बार्शी तालुक्‍यातील ढोराळे, सुर्डी, राजापूर आदी गावांतील शेतकऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली. 

जिल्हा परिषदेचे चंद्रकांत होळकर, कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी, डॉ. अमोल शास्त्री, डॉ. विकास भिसे, शेतकरी अमोल काकडे, धनाजी शेळके, शिवानंद कोटगी याच्यासह अन्य शेतकऱ्यांनी कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवला. डॉ. तांबडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन लॉकडाउन नियमाचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून शेतीची कामे कशी करावीत, याबाबत मार्गदर्शन केले. कृषी मंत्रालयाच्या सूचना सांगितल्या. आरोग्य सेतू ऍपबाबत माहिती दिली. स्थानिक स्तरावर तयार केलेले मास्क वापरावेत. सध्या उभ्या असलेल्या रब्बीच्या पिकांची काढणी व संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करून धीर दिला. महाराष्ट्र

गावातील उपलब्ध पालेभाजी व्हाट्‌सऍपद्वारे मेसेज देऊन एकत्रित करत असून शेजारच्या गावातील ग्राहकांना तो उपलब्ध आहे. काही प्रमाणात विक्री सुरू आहे, परंतु, काही शेतीमाल जास्त असल्याने तो शहराकडे विक्रीस पाठवावा लागत आहे. त्यावेळी सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे. 
धनाजी शेळके, सुर्डी 

शेतमाल वाहतुकीस परवानगी मिळावी आणि पेट्रोल, डिझेल मिळावे. द्राक्ष विक्री करण्यासाठी शहरातील सोसायट्यांशी संपर्क साधावा लागणार आहे. शेतमाल वाहतूक करताना पोलिसांचे सहकार्य व संबंधित यंत्रणांची परवानगी मिळणे गरजेचे आहे. 
अमोल काकडे, ढोराळे 

सध्या शेतकऱ्यांचा शेतमाल विशेषत: पालेभाजी व फळेची विक्री करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहोत. गृहनिर्माण सोसायट्यांत संपर्क साधून योग्य ती खबरदारी घेऊन शेतकऱ्यांच्या गटांना ग्राहकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 
डॉ. लालासाहेब तांबडे, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT