3Corona_Danger_50.jpg 
सोलापूर

केंद्रीय पथकातील एका सदस्याला कोरोना ! दोन सदस्यातील एकजण क्‍वारंटाईन

तात्या लांडगे

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील कोरोनावाढीचा आणि मृत्यूदर वाढीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यांचे केंद्रीय पथक सोलापुरात दाखल झाले. पाच दिवस ते मुक्‍कामी राहून अभ्यास करून प्रशासनाला योग्य त्या सूचना करणार होते. मात्र, या पथकातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. डॉ. ए. जी. अलोन असे त्यांचे नाव असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.

कोरोना झाला नेमका कुठे? 
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रुग्णवाढीचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने 50 केंद्रीय पथकांचे दौरे आहेत. कोरोनासंबंधी अभ्यास करताना त्यांचा अनेकांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध येतो. तरीही ते खबरदारी घेऊनच कामे पार पाडतात. असे असतानाही डॉ. अलोन यांना कोरोनाची बाधा नेमकी झाली कुठे, ते पुण्यावरून येताना झाली की त्यापूर्वीच त्यांना कोरोना झाला होता, का वाहनाच्या चालकाच्या माध्यमातून झाला, या प्रश्‍नांची अजूनही उकल होऊ शकलेली नाही. 

सोलापूर शहरात दररोज तीनशेहून अधिक रुग्ण वाढत असून सरासरी सातपेक्षा अधिकजणांचा मृत्यू होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील कोरोना संशयितांचे टेस्टिंग वाढविण्यात आल्याने दररोज सहाशे ते सातशे रुग्णांची भर पडू लागली आहे. दुसरीकडे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही दररोज पाच इतके आहे. बार्शी, माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा या तालुक्‍यांमध्ये दररोज रुग्ण वाढत आहेत. शहरातील काही भागात रुग्णवाढीचा वेग मोठा असल्याचेही चित्र आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून हे केंद्रीय पथक संबंधित तालुक्‍यांना, शहरातील काही भागात पाहणी दौरा करणार होते. पाच दिवस मुक्‍कामी, असा त्यांचा दौरा ठरला होता. मात्र, पुण्यावरून स्वत:च्या वाहनातून येणाऱ्या या पथकाचा वाहन चालक गुरुवारी (ता. 8) कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्या दोन सदस्यांची आज कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी एक सदस्य कोरोना बाधित झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर दुसरे सदस्य डॉ. पियुष जैन हे क्‍वारंटाईन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT