corona
corona 
सोलापूर

कोरोनाचा ग्रामीण भागात प्रवेश; सांगोल्यात आढळला कोरोनाचा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आजपर्यंत सोलापूर शहरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही प्रवेश केला आहे. सांगोला तालुक्यात कोरोना बाधित व्यक्ती आढळला असून या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सांगोला तालुक्यातील घेरडीमध्ये हा रुग्ण असल्याचे समजते.
सोलापूर जिल्ह्यात आज नव्याने सापडलेल्या नऊ रुग्णांमध्ये पाच रुग्ण हे सारीचे आहेत व उर्वरित रुग्ण हे कोरोनाचे आहेत. नव्याने सापडलेल्या ९ रुग्णांमध्ये चार रुग्ण हे शास्री नगर परिसरातील, एक रुग्ण कुमठा नाका परिसरातील, एक रुग्ण लष्कर परिसरातील,  दोन रुग्ण मोदीखाना परिसरातील, एक रुग्ण सांगोला तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. आज दिवसभरात ८२ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ७३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. नउ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात आढळलेल्या ५० कोरोना बाधित व्यक्तींपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित ४६ जणांवर श्री सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १०८६ व्यक्ती या सध्या होम क्वारंटाइनमध्ये असून इन्स्टि्युशनल क्वारंटाइनमध्ये ६७४ व्यक्ती आहेत. आयसोलेशन वार्डात असलेल्या ११२९ व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ९८७ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९३७ जण हे कोरोना निगेटिव्ह आहेत तर ५० जण पॉझिटिव आढळले आहेत. अद्यापही १५२ जणांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT