Corona Patient Sakal
सोलापूर

Corona Patients : सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाढले कोरोनाचे ३२ रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या ११३ वर

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही जिल्हा प्रशासन असो वा महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची स्थिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही जिल्हा प्रशासन असो वा महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची स्थिती आहे.

सोलापूर - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही जिल्हा प्रशासन असो वा महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची स्थिती आहे. पाहता पाहता तीन दिवसांतच रुग्णांची शंभरी पार झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या ११३ झाली आहे. दरम्यान, आज (ता. १२) एकाच दिवशी जिल्ह्यात ३२ रुग्ण वाढले आहेत.

अक्कलकोट ग्रामीणमध्ये तीन, बार्शी ग्रामीण एक, करमाळा ग्रामीणमध्ये तीन, माळशिरस ग्रामीणमध्ये आठ, मंगळवेढा ग्रामीणमध्ये एक, उत्तर सोलापूर ग्रामीणमध्ये सहा, दक्षिण सोलापूर ग्रामीणमध्ये एक रुग्ण आहे. या सात तालुक्यांच्या शहरी भागात एकही रुग्ण नाही. माढा तालुक्यात १३ रुग्ण असून त्यातील एक रुग्ण केवळ माढा शहरातील आहे. मोहोळ शहरात एक तर ग्रामीणमध्ये चार रुग्ण झाले आहेत. सांगोल्यात पाच रुग्ण असून शहरात एकमेव रुग्ण आहे.

पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक २१ रुग्ण असून त्यातील १२ रुग्ण वेगवेगळ्या गावांमधील आहेत. माढा (१३) व पंढरपूर (२१) या दोन तालुक्यात खूप महिन्यानंतर रुग्णसंख्या दोनअंकी झाली आहे. शहरी भागाच्या तुलनेत गावागावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सोलापूर शहरात बाधित कमी आढळत आहेत, पण दररोज संशयितांचे टेस्टिंग शंभर ते सव्वाशेपर्यंतच आहे. बुधवारी (ता. १३) शहरात ७२ संशयितांमध्ये पाच तर ग्रामीणमध्ये २४९ संशयितांमध्ये २७ रुग्ण आढळले आहेत. सद्य:स्थितीत शहरात ४६ तर ग्रामीणमध्ये ६७ रुग्ण बाधित असून बहुतेक रुग्णांमध्ये तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नसल्याने होम आयसोलेशनच्या माध्यमातून घरीच उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

रुग्णवाढ चिंता वाढवणारी ठरू नये, यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. नागरिकांनी प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा गर्दीत मास्कचा वापर करावा. लक्षणे असल्यास स्वत:हून तत्काळ टेस्ट करून, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह कोसळणार पावसाची धार! 'या' भागात अलर्ट जारी; पहा २४ तास कसे असेल हवामान?

Donald Trump Tariffs: ट्रम्प यांनी टाकला आणखी एक बॉम्ब; आता सोने 10,000 रुपयांनी महागणार, गुंतवणूक करावी का?

Buldhana News: खंडणी मागणारे पाच पोलिस कर्मचारी निलंबित; गुन्हा दाखल, दोन लाखांची केली होती मागणी

Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद, एका दहशतवाद्याला धाडलं यमसदनी

Two Faced Rudraksha: दोनमुखी रुद्राक्ष म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आध्यात्मिक रहस्य आणि आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT