सोलापूर ः सोलापूर महापालिका क्षेत्रात आज सोमवारी ३३ नवीन रुग्ण आढळले. आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या १२२१ वर पोचली आहे. आठजणांचा मृत्यू झाला.
शहरातील दाराशा हाॅस्पिटल, देगाव, जोडभावी युपीेएचसी हॅास्पिटल, पाटील वस्ती, विनायकनगर, महादेवनगर एमआयडीसी, दाजीपेठ, साईआंगन सोलापूर, भवानी पेठ, विडी घरकूल, आनंदनगर, ब्रह्मनाथ नगर, कुमठा नाका, जुना विडी घरकूल, न्यू बुधवार पेठ, सिद्धेश्वर पेठ, गुरुवार पेठ, कोंतम चौक, मोदीखाना नरसिंगनगर, बॅाम्बे पार्क जुळे सोलापूर, भूषणनगर, उत्तर कसबा, न्यू पाच्छा पेठ या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.
आज सोमवारी २२५ अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९२अहवाल निगेटीव्ह आले, तर ३३ अहवाल पॅाझिटीव्ह आले. आतापर्यंत ५५ जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले. आठजणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये शासकीय रुग्णालय चार व यशोधरा रुग्णालयात चारजणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ७७५८ रुग्णांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७७३७ जणांचा अहवाल प्राप्त झाला. पैकी६५१६ अहवाल निगेटीव्ह तर, १२२१ जणांचा अहवाल पॅाझीटीव्ह आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.