corona  sakal
सोलापूर

कोरोना रुग्णांची शंभरीकडे वाटचाल! मंगळवारी वाढले २६ रुग्ण; सोलापूर जिल्ह्यात ८८ सक्रिय रुग्ण

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी (ता.११ ) एकाच दिवशी २६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यात शहरातील नऊ तर ग्रामीणमधील १७ रुग्ण आहेत. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८८ झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी (ता.११ ) एकाच दिवशी २६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यात शहरातील नऊ तर ग्रामीणमधील १७ रुग्ण आहेत. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८८ झाली आहे.

ग्रामीणमधील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. अक्कलकोट, बार्शी, करमाळा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. मोहोळ तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक १७ रूग्ण पंढरपूर तालुक्यात आहेत. त्याखालोखाल माढ्यात सात, माळशिरसमध्ये सहा व सांगोला तालुक्यात पाच, असे ग्रामीणमधील एकूण ४३ रुग्ण उपचार घेत आहेत.

ग्रामीणमधील ४३ रुग्णांपैकी बहुतेक रुग्णांना कोणतीही तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. दुसरीकडे शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता अर्धशतकाच्या (४५) उंबरठ्यावर आहे. त्यापैकी तीन ते चार रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. दरम्यान, एका दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या २६ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची देखील चाचणी करण्यात आली आली असून त्याचे रिपोर्ट उद्या (बुधवारी) येतील. बाधित रुग्णांना विशेषतः: ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत, त्यांना सात दिवसांचे होम आयसोलेशन बंधनकारक आहे. त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे अपेक्षित आहे.

आठ तालुक्यांच्या शहरी भागात नाही कोरोना

दिलासादायक बाब म्हणजे अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर व दक्षिण सोलापूर या तालुक्यातील शहरी भागात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, ग्रामीणमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT