सोलापूर

वैराग मधील किराणाचे व्यापारी पुण्यात  गेल्यानंतर आढळले कोरोना पॉझिटिव्ह

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाने थैमान घातलेला असताना आता सोलापूरच्या शेजारी असलेल्या तालुक्यातही कोरोना बाधित रुग्ण आढळू लागले आहेत. बार्शी तालुक्यातील वैराग येथील किराणा मालाचे होलसेल व्यापारी 23 मे रोजी पुण्याला गेले. त्याठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत हे व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. 


मोहोळ तालुक्यातील पेनुर, पाटकुल, ढोक बाबुळगाव, सावळेश्वर, सांगोला तालुक्यातील घेरडी, पाचेगाव, दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव, अक्कलकोट शहर या ग्रामीण भागात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर बार्शी तालुक्यातही वैराग येथील किराणा मालाच्या होलसेल व्यापाऱ्याच्या माध्यमातून कोरोनाने प्रवेश केला आहे. वैराग मधील हे व्यापारी सध्या पुणे येथे असून त्यांच्या संपर्कात आलेल्या वैराग परिसरातील पंधरा जणांना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली. या पंधरा जणाना क्वारंटाइन करण्यात आले असून कोरोना चाचणीसाठी त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.

या किराणा होलसेल व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या आणखीन इतर व्यक्तींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार शेलार यांनी दिली. प्रांताधिकारी हेमंत निकम म्हणाले,  वैराग व परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती पाहणी केली जात असून बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आज सायंकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत वैराग परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश पारित केला जाणार असल्याचेही प्रांताधिकारी निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT