Corona report of six RPF who came from Mumbai for security was positive 
सोलापूर

'ते' सहा आरपीएफ कुर्डुवाडी येथील बराकीत एक दिवस राहिले होते 

सकाळ वृत्तसेवा

कुर्डुवाडी (सोलापूर) : मुंबईहुन बंदोबस्तासाठी आलेल्या 20 रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांपैकी (आरपीएफ) सहाजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते कुर्डुवाडी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या वेगळ्या बराकीमध्ये एक दिवस राहिले होते. येथे प्राथमिक तपासणी करुन त्यांना सोलापूर येथे पाठवले असता अहवाल पॉझिटिव्ह आले, असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिली. 
रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या 20 कर्मचाऱ्यांचे हेडक्वार्टर मुंबई आहे. ते सोलापूर येथे आले. तेथून कुर्डुवाडी येथे आल्यानंतर रात्री मुक्कामास थांबले. दुसऱ्या दिवशी 10 जणांची रेल्वे दवाखान्यात प्राथमिक तपासणी करण्यात आली. व सर्वांना सोलापूर येथील दवाखान्यात पाठवण्यात आले होते. तेथे स्वॅबची तपासणी केली असता सहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दहाजण कुर्डुवाडी येथील वेगळ्या बराकीमध्ये होते. बाहेर कोठेही गेले नसल्याचे रेल्वेच्या संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. उर्वरित दहापैकी तीन पंढरपूर तर सात जेऊर येथे असल्याचे समजते. नुकतेच कुर्डुवाडीपासुन सुमारे सहा किलोमीटवर लऊळ येथील एक महिला कोरोनामुळे मृत झाली होती. त्यातच ही सहा कोरोना बाधीत आरपीएफची माहिती समजताच कुर्डुवाडी शहर व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. 
मुख्याधिकारी कैलास गावडे म्हणाले, सर्वांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंगसह शासनाचे नियम पाळावे. स्वतः ची, कुटुंबाची व समाजाची काळजी घ्यावी. 
कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष अडागळे म्हणाले, सर्वांनी आरोग्याची काळजी घेत सर्दी, खोकला, ताप असल्यास दवाखान्यात तपासणी करुन घ्यावी. शासनाचे नियम पाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT