pathak fb 
सोलापूर

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही..!

संजय पाठक

सोलापूर : कर्फ्यूतील भ्रमंतीचा आज माझा तिसरा दिवस. सगळीकडे नीरव शांतता पसरलीय सोलापुरात. प्रत्येक रस्त्यावर फिरताना मला बिपाशा बासूच्या राज चित्रपटातील गाणं आठवतं... यहॉं पे सब शांती शांती है..! (आता ही गोष्ट वेगळी. मला गाण्यापेक्षा तसं पाहिलं तर बिपाशाच जास्त छान वाटायची, तेव्हा हं तेव्हा...) पण या "शांती... शांती...' पणाला छेद देणारी घटना, प्रसंग मी अनुभवला तो शाहीर वस्ती परिसरात. कर्फ्यूत भ्रमंती करताना टिळक चौक, चाटी गल्ली नंतर तुळजापूर वेस मार्गे शाहीर वस्ती परिसरात जेव्हा माझी स्वारी गेली तेव्हा तिथं मी जे पाहिलं, अनुभवलं ते धक्कादायक, शॉकिंग असंच होतं.

आहो... गणपतीच्या मिरवणुकीला जशी गर्दी असते तशी गर्दी या परिसरातील प्रत्येक बोळा-बोळात मला दिसून आली. सग्गळे... हो अक्षरशः या वस्तीतील प्रत्येक घराघरातील सग्गळे सग्गळे मेंबर्स रस्त्यावर चकाट्या पिटत होते. सोशल डिस्टन्स पाळा असं ते मोदीजी घसा कोरडा करून, करून सांगताहेत पण या वस्तीत चक्क एकमेकांतील गप्पागोष्टीत विनोद झाल्यानंतर टाळ्या देणं, एकमेकांशी गळाभेट अग्गदी खुलेआम सुरू आहे. हे दृष्य अनुभवून मला या परिसरातील सर्व लोक सोलापूरचेच नव्हे तर मानवतेचे शत्रू वाटू लागले. मराठी कलाकारांनी कोरोनाशी कसं लढावं या विरोधात एक उपरोधिक फीत बनवली आहे. त्यातील काही बोल असे आहेत... "आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण आम्हाला कोरोना होत नाही. आम्हाला कशाची काळजी, जोवर आमचं कुणी जात नाही. घरात बसणाऱ्यांना आमची साथ नाही, जोवर आमचं कुणी जात नाही...' हे बोल शाहीर वस्ती परिसरातली प्रत्येक घरास, प्रत्येक व्यक्तीस तंतोतंत लागू होतात. जोडभावी पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या या वस्तीवर पोलिसांची विशेष मेहेरबानी आहे का...? असा विचारही माझ्या मनात त्याक्षणी चमकून गेला.

या वस्तीतून बारामती बॅंकेवरून पुढे जाताना तिथं पोलिसांची गाडी दिसली. म्हटलं पोलिसांची चौकशी करावी, त्यांना काही हवं - नको ते पाहावं. म्हणून त्यांना नमस्कार करून ओळख करून घेण्या-देण्याचा सोपस्कार पार पडल्यावर चहा घ्यायचा असेल तर इथं जवळच माझ्या मित्राचं घर आहे, आपण जाऊत तिथं असं मी म्हटलं. पण या कर्मचाऱ्यांनी समोरच्या इमारतीतील त्यांच्या एका नातेवाइकाकडून चहा ऑलरेडी मागवला होता. त्यांच्याशी गप्पाटप्पा करून पुढे निघालो.

 काशी कापडी गल्ली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुन्या कपड्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असलेला हा भाग. परंतु हा भाग आज प्रथमच पूर्णतः निर्मनुष्य दिसून आला. श्री शिवगंगा मंदिराचे सदोदित खुले असणारे दरवाजे बंद पाहून मनात चर्रर्र झालं. बालपणीच्या संस्कारानुसार लांबूनच मनोमन नमन करून पुढे स्टेट बॅंक असलेल्या रस्त्यावरून गाडी नेताना दोन्ही बाजूची किराणा दुकानं बंद दिसली. सुका मेवा, खजूर, किराणा भुसारचं इथलं मोठं मार्केट कोरोनामुळं आज निस्तेज दिसून आलं. अक्षरशः लाख्खो रुपयांची उलाढालीचं इथलं मार्केट ठप्प झाल्याची बोचणी माझ्या संवेदनशील मनाला सतत जखमी करतेय.

बाळीवेस मार्गे तरटी नाका चौकीकडे आलो. रात्रीचा अंधार पडू लागला होता. चौकीत नेहमीची लगबग दिसून येत नव्हती, पण बाहेर तीन-चार दुचाकी होत्या. आत काही माणसांचे बोलण्याचे आवाज येत होते. पुढे तरटी नाका. तसा सोलापूरकरांचा हळू आवाजात उच्चारण्याचा हा शब्द. येथील नगरवधूंची वस्ती आज अंधारात लुप्त झाली होती. सायंकाळची वेळ असूनही इथं सर्वत्र शांतता दिसून आली. भवानीच्या पाराची ही शांतता त्यांना नकोशी अशीच नं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Loal: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

SCROLL FOR NEXT