corona
corona 
सोलापूर

सोलापुरात कोरोनाचा दुसरा बळी, इंदिरानगर भागातील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू, संपर्कातील आठ जणांची तपासणी 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरातील इंदिरानगर परिसरातील 69 वर्षीय महिलेचा आज (रविवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या रविवारी (ता. 12) सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला व त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आठ दिवसात आज (रविावर, ता. 19) दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
या महिलेबाबत जिल्हा प्रशासनाला शनिवारी (ता. 18) रात्री माहिती मिळतात सोलापूर शहर पोलिस व महापालिकेच्यावतीने इंदिरानगर, 70 फूट रोड हा परिसर सील करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत कोरोनाचे 15 रुग्ण सापडले असून त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 13 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
सोलापूर जिल्ह्यातील 718 व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 505 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यातील 490 जण हे निगेटिव्ह आले आहेत तर 15 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 213 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT