corona 
सोलापूर

भारतरत्न इंदिरानगरातील कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील 47 जणांची कोरोना चाचणी

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरातील सत्तर फूट रोड परिसरातील भारतरत्न इंदिरानगर या परिसरातील 69 वर्षीय महिलेचा आज (रविवार) दुपारी कोरोनाने मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कात आलेल्या 47 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. आज (रविवार) दुपारपासून ते सायंकाळपर्यंत कोरोना चाचणीचे 57 रिपोर्ट प्राप्त झाले असून हे सर्व रिपोर्ट आल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डात 755 जण असून त्या सर्वांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यातील 563 जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 548 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 13 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT