Corona test sakal
सोलापूर

सोलापूर : घरीच कोरोना टेस्ट; कोणाला नाही पत्ता

विनानोंदणी सेल्फ टेस्टिंग किटची सर्रास विक्री; औषध दुकानांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या केंद्रावर जावून चाचणी केली आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात भरती व्हावे लागते. या भीतीने अनेक नागरिक घरच्या घरी टेस्ट करून घेण्याकडे सध्या शहर परिसरातील नागरिकांचा कल वाढला आहे. कारण कोरोना चाचणी घरी केल्यानंतर कोणालाही कळणार नाही. मात्र, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड न देता शहरातील औषध दुकानांवर सेल्फ टेस्टिंग किट अगदी सहजपणे मिळत असल्याचे चित्र ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

सेल्फ टेस्ट किट घेवून चाचणी करणाऱ्या अशा बाधित नागरिकांना कोरोना झाला असेल तरी त्याची प्रशासनाकडे नोंद होतच नाही. ही बाब गंभीर ठरू शकणार आहे. हे नागरिक घरीच राहून उपचार घेतात. बाधितांचा खरा आकडा समोर येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि महापालिका प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढणार आहे.

ठळक बाबी...

  • सेल्फ कीट घेण्यापूर्वी ग्राहकाला आधार कार्ड दाखविणे बंधनकारक आहे

  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास नोंदणी करणे आवश्‍यक

  • आधार कार्ड वरील माहिती नोंदवून मगच किट द्यावी

  • २५० रुपये मोजले की कीट मिळते

सातरस्ता, दत्त चौक, आदी भागातील औषधी दुकानात मोबाईल नंबर शिवाय कीट मिळते आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्षशहरातील औषधी दुकांनामध्ये कोरोना सेल्फ किट मिळत असून, अनेकजण घरच्या-घरी चाचणी करीत आहेत. मात्र किटची विक्री करीत असताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक नोंद करणे आवश्‍यक आहे. मात्र असे न होता सर्रास किटची विक्री होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

औषध दुकानांदाराशी संवाद

  • प्रतिनिधी - कोरोना सेल्फ किट पाहिजे

  • कर्मचारी - किती

  • प्रतिनिधी - एक

  • कर्मचारी - २५० द्या

  • प्रतिनिधी - यापेक्षा कमी दराचे नाही का?

  • कर्मचारी - नाही

पैसे देवून प्रतिनिधीने किट खरेदी केली. किट खरेदी करताना साधे नाव किंवा मोबाईल क्रमांक देखील विचारण्यात आला नाही.

आकडे बोलतात

एकूण औषध दुकाने - ३,८००

शहरातील औषध दुकाने - १,३००

ग्रामीणमधील औषध दुकाने - २,५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

'आईने हातात पैसे दिले अन् म्हणाली ‘इथून निघून जा'; रवी किशन यांच्या आयुष्यातला धक्कादायक किस्सा

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला पाहिजे - आनंद दुबे

SCROLL FOR NEXT