कोरोना चाचणी  File photo
सोलापूर

मराठा आक्रोश मोर्चाला आलेल्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह !

मराठा आक्रोश मोर्चाला आलेल्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह ! सात चेक पोस्टवर 511 जणांची टेस्ट

तात्या लांडगे

पोलिस प्रशासनाच्या पत्रानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने नाकाबंदीच्या ठिकाणी 511 जणांची कोरोना चाचणी केली.

सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चावेळी (Maratha Akrosh Morcha) गर्दी होईल आणि कोरोना (Covid-19) पॉझिटिव्ह एखादा तरुण अनेकांना बाधित करू शकतो, या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या पत्रानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने नाकाबंदीच्या ठिकाणी 511 जणांची कोरोना चाचणी (Covid test) केली. शनिवार, रविवारी (ता. 4) या दोन दिवसांत सात चेक पोस्टवर 511 संशयितांची कोरोना चाचणी पार पडली. त्यात एकही व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली नाही, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. अरुंधती हराळकर (Municipal Health Officer Dr. Arundhati Haralkar) यांनी दिली. (Corona test of those who came to Maratha Akrosh Morcha is negative)

सोलापुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला असून, ग्रामीण भागातील संसर्गही कमी होत असल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभरातून मराठा बांधव सोलापुरात येणार होते. त्यातील एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह तरुणामुळे अनेकांना कोरोनाची बाधा होऊ शकते, अशी भीती पोलिसांना होती. त्यामुळे ग्रामीण व शहर पोलिस प्रशासनाने शहरालगतच्या नाकाबंदी पॉईंटवर संशयितांची (रॅंडमली) कोरोना चाचणी करावी, अशी मागणी केली. त्यानुसार महापालिकेने सात नाकाबंदी पॉईंटवर 11 स्वॅबरची नेमणूक केली. त्यांनी 3 जुलैला (शनिवारी) 205 जणांची तर मोर्चाच्या दिवशी (रविवारी) 306 संशयितांची कोरोना चाचणी केली. त्यापैकी एकाही व्यक्‍तीचा रॅपिड अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही, हे विशेष. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिष बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील डॉक्‍टरांनी काम पाहिले.

संकल्पना उत्तम, पण नियोजनाचा अभाव

महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिस प्रशासनाच्या पत्रानुसार सात चेक पोस्टवर कोरोना चाचणीची मोहीम राबविण्याचे नियोजन केले. मात्र, नवीन विजापूर नाका येथे रविवारी एकाही संशयिताची चाचणी करण्यात आली नाही. तर होटगी नाका चेक पोस्टवर दोन दिवसांत एकाही संशयिताची कोरोना चाचणी झाली नाही. नवीन अक्‍कलकोट नाका व दळवे-पाटील शोरूमजवळील चेक पोस्टवर 351 जणांची तर उर्वरित पाच ठिकाणी केवळ 160 संशयितांची कोरोना चाचणी पार पडली. विशेष म्हणजे जे आंदोलक स्वत:हून चाचणी करायला पुढे आले, त्यांचीच कोरोना चाचणी त्या ठिकाणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

भारतीय कोचचा संघाने पटकावलं T20 World Cup 2026 स्पर्धेचं शेवटचं तिकीट! सर्व २० संघही ठरले

Barshi Fraud : पोकलेन मशिन खरेदीतून भागीदारीत व्यवसायाचे अमिष दाखवूून मुंबईच्या व्यापाऱ्याची १२ लाखांची बार्शीत फसवणूक

Anandwadi Protest : रस्त्यासाठी गावकऱ्यांचे अकरा तास जलसमाधी आंदोलन; प्रशासनाची मोठी धावपळ

SCROLL FOR NEXT