corona 
सोलापूर

सोलापुरातील 214 जणांचा कोरोना चाचणी रिपोर्ट प्रलंबित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ परिसरात आज (शनिवारी) दुपारी कोरोनाबाधित एक व्यक्ती आढळला आहे. आज दुपारी 165 जणांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट प्रलंबित होते. यात 49 ची वाढ झाली असून आता 214 जणांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सायंकाळी दिली. 
सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 691 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी एक हजार 56 जण सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. उर्वरित 635 लोकांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमये एक हजार 31 लोक होते. 315 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही 716 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत. आयसोलेशन वॉर्डांमध्ये 718 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 504 व्यक्तींचे कोरोना चाचणी रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. 490 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पाच्छा पेठ परिसरातील 13 व रविवार पेठ परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. पाच्छा पेठ परिसरातील एका व्यक्तीचा यापूर्वी मृत्यू झाला असून उर्वरित 13 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT