सोलापूर

सोलापूरच्या राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्रातही होणार कोरोना टेस्ट

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर-पुुणे महामार्गावरील राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्रातील प्रयोगशाळा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. कोरोनाची साथ आटोक्यात येईपर्यंत ही प्रयोगशाळा, इमारत व कर्मचारी हे महापालिकेच्या पर्यायाने शासकीय रुग्णलाय प्रशासनाच्या नियंत्रणात काम करणार आहेत. महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहे. 

डाळींब संशोधन केंद्रात असलेली प्रयोगशाळा, तसेच स्टेप वन आरटी-पीसीआर अॅन्ड अॅटोमाईड न्युक्लिक अॅसिड हे यंत्र ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याचा ताबा डाॅ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनयमातील तरतुदींचा वापर करण्यात आला आहे. 

सोलापूर महापालिकाही उभारणार संशोधन केंद्र 
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका विषाणू संशोधन व निदान केंद्र उभारणार आहे. त्यासाठी पदभरती करण्यात येत आहे. सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वरचेवर वाढतच चालली आहे. त्यातच संशयितांचे स्वॅब तपासणीसाठीचे अहवाल पुण्यालाही पाठवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातच हे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. 

अंबेजोगई येथे कोविड 19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेस महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे . या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत केवळ करोनाचीच नव्हेतर भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही ही विषाणूच्या संसर्गाचे संशोधन व निदान केले जाणार आहे. त्याच धर्तीवर सोलापूर महापालिकेचे हे केंद्र असणार आहे. 

राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी या विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचे तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रयोगशाळेत केवळ कोरोनाच नव्हे तर भविष्यात उद्भवणा-या कोणत्याही विषाणू संसर्गाचे संशोधन व निदान होणार आहे.

कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबचे निदान त्वरीत व्हावे यासाठी ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. प्रयोगशाळा शासकीय रुग्णालयातच ठेवायची की स्वतंत्र ठिकाणी याचा निर्णय अद्याप झाला नाही. प्रयोगशाळेसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री शासनामार्फत उपलब्ध होणार असून, संशोधक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेमार्फत केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT