Corona test will take place in 15 minutes work under the guidance of the amrut kare 
सोलापूर

कोरोना तपासणी होणार 15 मिनिटात; विहाळच्या अमृत करेंच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू 

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : सध्या कोरोनाने जगात थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारने कोरोनाची तपासणी तात्काळ होण्यासाठी कोरोना तपासणी किट बनवण्यास परवानगी दिली आहे. या किटमुळे 15 मिनिटात कोरोना रोगाचा चाचणी करता येणार आहे. पुण्यातील इम्युनोसायन्स इंडिया प्रा.लि. या कंपनीत हे कोरोना तपासणी किट बनवण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्‍टर अमृत ज्ञानदेव करे हे विहाळ (ता. करमाळा) येथील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम वेगाने सरू असून दररोज 40 हजार कोरोना तपासणी किट तयार केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या लढाईत हे काम होत आहे. 

अमृत करे यांचे प्राथमिक शिक्षण विहाळ (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले आहे. तर पुढील शिक्षण सैनिक स्कूल, सातारा येथे झाले. त्यांचे वडील ज्ञानदेव करे हे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. अमृत यांनी उच्च शिक्षण पुणे येथे घेतले आहे. विहाळ येथे त्यांचे घर असून सुट्टीच्या दिवशी ते हमखास विहाळ येथे मुक्काम असतात. 
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. भारतात जास्त जास्तीत रूग्णांची तपासणी होणे आवश्‍यक आहे. यासाठी कोरोना तपासणी किट बनवण्यासाठी भारतात आठ कंपन्याना परवानगी दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन कंपन्या आहेत. त्यातील एक पुणे येथील इम्युनोसायन्स इंडिया प्रा. लि. (कुसगांव, पुणे) या कंपनीचा समावेश आहे. कोरोना या गंभीर साथीच्या संकटात इम्युनोसायन्स इंडिया या कंपनीने हे उत्पादन सुरू आहे. भारतातच कोरोना चाचणी किटचे उत्पादन सुरू केल्याने इतर देशाकडे यासाठी आता भारतातला हात पसरवा लागणार नाही. ही कंपनी 2009 ला अस्तित्वात आली असून मलेरिया, डेंग्यू, एचआयव्ही, हेपॅटायटीस बी, हेपॅटायटीस सी आजारासाठी निदान चाचण्याचे उत्पादन करणारी ही प्रमुख कंपनी आहे 
कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्‍ट अमृत करे म्हणाले, कोरोना रोगाला आळ घालण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे तपासणी किट बनवण्यासाठी आम्ही अर्ज केल्यानंतर कंपनीचा नावलौकिक व गुणवत्ता पाहुन तात्काळ परवानगी देण्यात आली आहे. कंपनीने तयार केले सर्व किट सरकारला देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या लढाईत आमच्या कंपनीला देशासाठी काम करण्याची संधी मिळाली असून डॉ. सतिश आपटे व अतुल तरडे यांनी यासाठीचे संशोधन केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण सर्व काम करत असल्याचे करे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT