1corona_20vaccine_20centres (1).jpg 
सोलापूर

कोरोना लसीकरणाचा वेग दुप्पट ! प्रत्येक केंद्रांवर दोनशेजणांना टोचली जाणार लस

तात्या लांडगे

सोलापूर : लसीकरणाची मोहीम तत्काळ संपावी आणि पुढील टप्प्यातील व्यक्‍तींचे लसीकरण सुरु होण्याच्या दृष्टीने लसीकरणाचा वेग दुप्पट करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर- जिल्ह्यात 11 ऐवजी 19 केंद्रे केली असून त्याठिकाणी एकाचवेळी शंभरऐवजी दोनशेजणांना लस टोचली जाणार आहे.

दुसरा टप्पा मार्चनंतर सुरु होईल
शहर- जिल्ह्यातील लसीकरणाची केंद्रे वाढविली असून त्याठिकाणी शंभरऐवजी दोनशेजणांना दररोज लस टोचली जाणार आहे. आठवड्यातून चार दिवस लस टोचली जाणार असल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची लसीकरणाची मोहीम तीन महिन्यांऐवजी दीड महिन्यात संपेल आणि त्यानंतर पुढील टप्पा सुरु होईल.
- डॉ. शितलकुमार जाधव, वैद्यकीय अधिकारी, सोलापूर

राज्यातील सुमारे सव्वाकोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचली जात आहे. सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, दाराशा, अश्‍विनी सहकारी रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटल आणि मार्कंडेय सहकारी रुग्णालयात प्रत्येकी दोनशे जणांना लस टोचली जाणार आहे. तत्पूर्वी, शहर- जिल्ह्यातील 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 जणांना लस टोचली जात होती. मात्र, लसीकरणासाठी विलंब लागत असून दुसरीकडे राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही. त्यामुळे या केंद्रांवर आता दररोज दोनशे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. राज्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्ड आणि को- व्हॅक्‍सिन या दोन प्रकारची लस टोचली जात आहे. लसीकरणाचा वेग आता राज्यभरातच दुप्पट केला जाणार आहे.

लसीकरणाचे 'असे' आहे नियोजन...

  • राज्यातील सात हजारांहून अधिक केंद्रांवर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना टोचली जाणार लस
  • तीन महिन्यांऐवजी लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडणार दिड महिन्यात
  • मार्चनंतर लसीकरणाचा दुसरा टप्पा; फ्रंट लाईनवरील व्यक्‍तींची नावे ऑनलाइन भरण्याची कार्यवाही सुरु झाली
  • दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाचे वाढणार केंद्रे; लस टोचलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांद्वारे होणार लसीकरण
  • प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुका, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा व शासकीय रुग्णालयांतून टोचली जाणार लस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Rule Changes: लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल; आता या गोष्टींसाठी चार्ज नाही

Minor Girl Incident : नाशिक जिल्हा अश्लीलतेच्या चर्तेतून बाहेर जात नाही, खरातनंतर खासगी व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीबाबत उचललं चुकीचं पाऊल

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

SCROLL FOR NEXT