dilip chavan zp.jpg 
सोलापूर

कोरोना लस गाव पातळीवर उपलब्ध करावी : जि.प.उपाध्यक्ष दिलीप चव्हाण

हुकूम मुलानी

मंगळवेढा (सोलापूर) :  कोरोना साथीचा प्रभाव वाढू नये म्हणून उपलब्ध करण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक लस गाव पातळीवर उपलब्ध करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांनी केली.
 कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने 74 हजार 300 इतकी लस जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली.त्यामध्ये अक्कलकोट 3454,बार्शी 6708,करमाळा 2192,मंगळवेढा 1749,सांगोला 1913,पंढरपूर 4981, दक्षिण सोलापूर 4357, उत्तर सोलापूर 1387,माढा 3725,माळशिरस 6508, मोहोळ 2098,असे 39072 रुग्णांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात 10539 रूग्णाला लसीकरण करण्यात आले. जवळपास हे काम समाधानकारक रीत्या झाले आहे 
हि लस सध्या मान्यताप्राप्त दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर  ठिकाणी उपलब्ध करण्यात आली.परंतु ग्रामीण भागात गाव पातळीवरून ते आरोग्य केंद्र व उपकेद्रा पर्यंत चे अंतर हे जास्त आहे शिवाय वयोवृद्धांना उन्हाळ्याच्या दिवसात व सध्या शासनाने कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घातलेले नियम विचार करता गावाजवळच उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपकेंद्रात उपलब्ध करावे. उपकेंद्रात समुदाय विकास अधिकारी व उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून गावपातळीवर लसीकरण करण्याच्या दृष्टीने शासनाने लक्ष घालणे आवश्यक आहे सुरुवातीला ही लस आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना  व महसूल,पोलीस,स्वच्छता  व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना  तसेच को-मार्विड रूग्ना बरोबर ज्येष्ठ नागरिकांना हि लस उपलब्ध करण्यात आली. आरोग्य खात्यातील यंत्रणा पुरेशा पद्धतीने काम करत आहे त्यामुळे लसीकरणातील अनुभव पाहता आता आरोग्य उपकेंद्र वर ही लस उपलब्ध करावयास अडचणी निर्माण होणार नाहीत शिवाय लस घेतल्याच्या जेष्ठ नागरिकांनी आपणाला काही होणार नाही हा विचार मनात आणून सोशल डिस्टंसिंग पालन करणे सोडून न देता शासनाने केलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन उपाध्यक्ष चव्हाण यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT