MARRIAGE.jpg 
सोलापूर

...म्हणून जवळ आलेली लग्नाची तारीख पुन्हा ढकलली पुढे

सुस्मिता वडतिले

सोलापूर : घरात बऱ्याच दिवसांतून आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यात घरातील पहिल्या मुलीचे किंवा मोठ्या बहिणीचे लग्न असेल तर विचारायला नको. जसजशी लग्नाची तारीख जवळ येईल तसतशी तयारी सुरूच असते. त्यात एकीकडे कुटुंबामध्ये विवाहाची उत्सुकता सुरू तर दुसरीकडे कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे अनेकांनी विवाह मुहूर्त काढला असला तरी नाईलाजाने यंदा कर्तव्य असणाऱ्यांचा मुहूर्त पुढे ढकलावा लागला आहे. यामुळे वधू-वरांची हौस अपुरी राहिली आहे. 

प्रत्येकाच्या घरी लग्न म्हटले तरी आनंदाचे वातावरण असते. लग्नघरात लग्न जमल्यापासून ते लग्न होण्यापर्यंत लगबग सुरू असते. ज्येष्ठ मंडळींची धावपळ, लहानांची धमाल मस्ती, बहीण-भावांनी मिळून वधू-वरांची केलेली चेष्टामस्करी यामुळे सर्वत्र आनंदीआनंद वातावरण निर्माण झालेले असते. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व गर्दीचे कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्यांचा विवाह मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. तर काहीजण घरच्याघरी साध्या पद्धतीने लग्न करणार आहेत. शासनाने काढलेल्या निर्णयानुसार गर्दी होता कामा नये. सर्वजण सुरक्षित राहावे यासाठी संचारबंदी लागू केली आहे. त्यात यात्रा, कार्यक्रम आणि लग्नसमारंभ करण्यास मनाई केली आहे. सध्याची परिस्थितीत मे आणि जून महिन्यात काढलेली लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच काहीजण सध्याची परिस्थिती पाहता पुढच्यावर्षी लग्न करणार आहेत. 


समाजापुढे आमचे लग्न एक आदर्श राहील
माझ्या लग्नाची तारीख मे महिन्यात काढली होती. त्याप्रमाणे शॉपिंग करण्यास सुरवातही केली होती. त्या पद्धतीने लग्नाच्या तयारीला सुरवात केली. परंतु कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकुळामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी आम्ही लग्नाची तारीख पुढे न ढकलता साध्या पद्धतीने घरच्याघरी लग्न करणार आहोत. त्यामुळे लग्नाची सर्व हौस करता येणार नसली तरीही समाजापुढे आमचे लग्न एक आदर्श राहील असा प्रयत्न करू. 
- श्रद्धा कोळेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT