सोलापूर

अकलूजमधील गुळवेनगरात आढळला कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार अकलूज (ता. माळशिरस) येथील गुळवेनगर मध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाला संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय आज अक्कलकोटमध्ये दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

अक्कलकोट येथे आढळलेले दोन्ही रुग्ण हे सारीचे आहेत. मौलाली गल्ली येथे एक व समर्तनगरात एका महिलेला सारीची लागण झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 103 इतकी झाली आहे. त्यामध्ये 63 पुरुष व 40 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज 37 जणांचे अहवाल दिले आहेत. त्यामध्ये 34 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या तिघांमध्ये दोन स्त्रिया तर एका पुरुषाचा समावेश आहे. रुग्णालयातून 33 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बाधित असलेल्या 64 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही 39 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT