Corona's havoc continues in Barshi taluka 16 patients found on Tuesday total number 213 
सोलापूर

बार्शी तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरूच; मंगळवारी आढळले 16 रुग्ण, एकूण संख्या 213 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर आणि तालुक्‍यात कोरोनाने थैमान घातले असून मंगळवारी पुन्हा 16 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील चार व ग्रामीण भागातील बारा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तालुक्‍यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 213 झाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली. 
शहरातीत म्हाडा कॉलनी एक पुरुष, कसबापेठ एक स्त्री, नागणे प्लॉट एक पुरुष व बारंगुळे प्लॉट एक स्त्री असे चार जण तर ग्रामीण भागातील घाणेगाव येथील दोन पुरुष व दोन स्त्रीया, गुळपोळी एक स्त्री, पानगांव एक स्त्री, पिंपरी साकत एक पुरुष व एक स्त्री, सासुरे दोन पुरुष, वैराग एक पुरुष, बाभळगाव एक स्त्री असे बारा जण कोरोनाबाधित आढळले आहेत. बार्शी शहर व वैराग येथे 163 जणांवर उपचार सुरु असून 42 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आरोग्य प्रशासनाने शहरात 38 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहितीही डॉ. जोगदंड यांनी दिली. 
शहर व तालुक्‍यातील दररोज वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने व व्यापाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळून सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर, तोंडाला मास्क, गर्दी करून उभा राहू नये याची काळजी घेणे जरुरीचे आहे. असे केले तर प्रशासनाला मदत होईल, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. शीतल बोपलकर यांनी केले केले. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambarnath Case : विवाहानंतर अवघ्या ६० दिवसांत काय घडलं? अंबरनाथमध्ये २८ वर्षीय विशाखाने बेडरूममध्ये घेतला गळफास; हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

Karad Politics: कराडमध्ये नगरसेवकांचे शक्तिप्रदर्शन; आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित मतदान

तारिणी मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

SCROLL FOR NEXT