1Corona_93_0.jpg 
सोलापूर

कुठं नेऊन ठेवलंय सोलापूर माझं ! जिल्ह्यात आज 872 पॉझिटिव्ह तर दहा पुरुषांसह चार महिलांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुसाट सुटला असून आज पुन्हा शहरातील नऊ तर जिल्ह्यातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 872 रूग्णांची वाढ झाली असून आता शहर-जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या सात हजार 49 झाली आहे.

ठळक बाबी...

  • शहर-जिल्ह्यातील आठ हजार 652 संशयितांची आज झाली टेस्ट
  • शहरातील 310 पॉझिटिव्ह जण पॉझिटिव्ह तर 27 वर्षीय महिलेसह नऊजणांचा मृत्यू
  • ग्रामीण भागात आढळले 562 कोरोना बाधित; त्यापैकी पाचजणांचा कोरोनाने घेतला बळी
  • शहर-जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 64 हजार 828 तर आतापर्यंत दोन हजार नऊजणांचा मृत्यू
  • आज बार्शीत सर्वाधिक 167 रुग्णांची वाढ; शहरातील 205 ठिकाणी आढळले 310 रुग्ण


शहरातील आणि जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स्‌ यासह अन्य आस्थापनांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. संशयितांचे टेस्टिंगही वाढविण्यात आले असून को-मॉर्बिड रुग्णांचा पुन्हा एकदा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. सर्वोतोपरी उपाययोजना करूनही कोरोनाची गाडी सुसाट सुटली असून कोरोनाच्या मृत्यूदरात सोलापूर पुन्हा पहिल्या क्रमांकाकडे आगेकूच करू लागला आहे. त्यासाठी लोकांचा बेजाबदारपणा कारणीभूत असून निर्बधाची कडक अंमलबजावणी होत नसल्याचेही कारण आहे. लक्षणे असतानाही लोक स्वत:हून टेस्ट करून घेत नाहीत. आजार बळावल्यानंतर दवाखान्यात दाखल होत असून त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागला आहे. एकाच घरातील तीन-चारजण कोरोना बाधित होत असल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. मृत्यू होणाऱ्यांमध्ये उपचारासाठी उशीरा दाखल होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कमी झालेला कोरोना पुन्हा वाढत असून त्यावर एकच उपाय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हाताची स्वच्छता ठेवणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हेच ठोस उपाय आहेत. तसेच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणे आणि त्यानंतरही काळजी घेतल्यास निश्‍चितपणे कोरोनाला आवर घालणे शक्‍य आहे.

तालुकानिहाय वाढलेले रुग्ण
अक्‍कलकोट (9), बार्शी (167), करमाळा (64), माळशिरस (99), मंगळवेढा (28), मोहोळ (17), उत्तर सोलापूर (19), पंढरपूर (65), सांगोला (29) आणि दक्षिण सोलापूर (15).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT