Dodka 
सोलापूर

भाजीपाला उत्पादकांमागे संकटांची मालिकाच ! दर नसल्याने टाकले दोडक्‍याचे पीकच उपटून ! 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याने पोमलवाडी (ता. करमाळा) येथील युवा शेतकरी विकास मगर यांनी आपल्या अर्धा एकर शेतात लावलेले दोडक्‍याचे पीकच उपटून टाकले आहे. दीड महिन्यापूर्वी मगर यांनी पंचवीस हजार रुपये खर्च करून सतराशे दोडक्‍याची रोपे लावली होती. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी बाजारपेठेत नागरिक गर्दी करत आहेत. मागील काही दिवसांत भाजीपाल्याचे दर कडाडले होते. परंतु सध्या मात्र बाजारात भाजीपाल्याची आवक अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर एकदम कोसळले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना भाजीपाल्यासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. कोथिंबीर, मेथी तसेच इतर भाजीपाला पिके भरपूर प्रमाणात आली असली तरी दर मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. 

आधी उत्पादन चांगले होते तर कोरोनामुळे मागणी नव्हती. नंतर पिके तरारून आली होती तर अतिवृष्टीमुळे ते सडून गेली होती. अशा एकामागे एक बिकट प्रसंगांना सामोरे जात, शेतकरी अडचणीत असूनही त्याने आर्थिक जुळवाजुळव करून भाजीपाला पिकांची लागवड केली. मात्र आता ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीड नियंत्रणासाठी महागडी कीटकनाशके फवारणी करूनही खर्च मात्र वाढत असल्याने संकटात भरच पडत आहे. 

भाजीपाला पिकाचे दर अचानकपणे कोसळल्यामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यातच बदलत्या हवामानामुळे पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे फक्त खर्च करण्यापेक्षा पीकच उपटलेले बरे म्हणून दोडक्‍याचे संपूर्ण पीक काढून टाकले आहे. 
- विकास मगर, 
शेतकरी, पोमलवाडी, ता. करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT