covishield_vaccine 
सोलापूर

पंढरपुरात उद्या लसीकरणाचा प्रारंभ ! शहरातील पाच ठिकाणी व्यवस्था; पहिल्या टप्प्यात डॉक्‍टर्स, पॅरामेडिकल स्टाफला प्राधान्य 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : येथे 16 जानेवारी (शनिवार) पासून डॉक्‍टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफमधील सुमारे तीन हजार लोकांना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. 16 जानेवारी रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या शेजारील संसर्गजन्य रुग्णालयात लसीकरणाचा प्रारंभ करण्यात येईल. 18 जानेवारीपासून शहरात पाच ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित लोकांना त्यांचे लसीकरण कुठे आणि किती वाजता आहे, याविषयीचा एसएमएस पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

डॉ. गिराम म्हणाले, संसर्गजन्य रुग्णालय, 65 एकर, लाईफ लाइन हॉस्पिटल, ऍपेक्‍स आणि श्री विठ्ठल हॉस्पिटल अशा पाच ठिकाणी 18 जानेवारीपासून लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्‍टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफला लस दिली जाणार आहे. या लोकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. दररोज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी संबंधितांना लसीकरण कुठे आणि किती वाजता केले जाणार आहे, याविषयीची माहिती एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे. संबंधित व्यक्ती त्या - त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्या व्यक्तींकडील आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र अशा फोटो असलेल्या ओळखपत्रावरून खात्री केली जाईल. 

प्राथमिक तपासणी केल्यानंतर लसीकरण कक्षात संबंधित व्यक्तीला लस दिली जाईल. त्यानंतर दक्षता म्हणून त्या व्यक्तीला अर्धा तास थांबवले जाईल. काही त्रास झाला आणि उपचाराची वेळ आल्यास फिजिशियन व आवश्‍यक मदतीची यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. अर्ध्या तासानंतर संबंधित व्यक्तीस घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. फक्त गरोदर व्यक्तीस लस दिली जाणार नाही. यंत्रणेकडून एसएमएस पाठवला गेलेल्या व्यक्तीशिवाय अन्य कोणालाही पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार नाही. पुढील टप्प्यातील कार्यवाही पुढील आदेशानंतर टप्प्या- टप्प्याने केली जाणार आहे, असे डॉ. गिराम यांनी नमूद केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT