पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे कौतुक करून पूर्वीची आणि सध्याच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांना सांगताना ‘ऑपरेशन परिवर्तन’मधील महिला. ESAKAL
सोलापूर

CP, SP ची सामाजिक बांधिलकी। एकाला पक्ष्यांची काळजी, दुसऱ्याने दिला निराश्रितांना रोजगार

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षा करणे या पलिकडेही पोलिसांचे काम असते, हे सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सामाजिक बांधिलकीतून ते दाखवून दिले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षा करणे या पलिकडेही पोलिसांचे काम असते, हे सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सामाजिक बांधिलकीतून ते दाखवून दिले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षकांनी मुळेगाव तांडा येथे सुरू केलेल्या परिवर्तन उद्योग समूहाला भेट दिली.

पोलिस आयुक्त बैजल यांना पक्ष्यांचा खूप लळा आहे. त्यांनी स्वत:च्या निवासस्थानी अपघातात जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची सोय केली. शाळकरी मुलांमध्येही पक्षीप्रेम जागृत व्हावे, म्हणून त्यांनी आपल्या निवासस्थानी तशी सोयदेखील केली आहे. एकीकडे शहरातील गुन्हेगारी (दुचाकी चोरी, घरफोडी, हाणामारी, कौटुंबिक हिसांचार, मटका-जुगार) असतानाही पोलिस आयुक्तांचे पक्षीप्रेम कमी झालेली नाही हे विशेष. खासदार सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याने त्यांना पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानी सुरु केलेल्या पक्ष्यांच्या निवारा केंद्रालाही भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्याचवेळी काही शाळांच्या मुलांनाही बोलावण्यात आले होते. खासदार सुळे यांनी काहीवेळ पक्षांसोबत आनंद घेतला. पोलिस आयुक्तांकडून पक्षांबद्दल माहितीही घेतली आणि त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुकही केले.यापूर्वीही पोलिस आयुक्तांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. दरम्यान, खासदार सुळे यांनी आयुक्तांच्या निवासस्थानावरून मुळेगाव तांडा येथे भेट दिली. त्याठिकाणी अवैध व्यवसायावर उदरनिर्वाह भागविणाऱ्या हातावरील पोट असलेल्या कुटुंबातील महिलांच्या व्यथा आणि त्यांचे पुनर्वसन पाहून त्याही भारावून गेल्या.

एसपी मॅडममुळे लागतेय शांत झोप
रात्रंदिवस हातभट्टी दारू तयार करणे, विक्री करण्याच्या अवैध व्यवसायातील ६०४ पैकी चारशेहून अधिक जणांनी तो व्यवसाय सोडून दिला आहे. त्या पुरुषांच्या बायकांना परिवर्तन उद्योग समूहातून शिलाई मशिन देण्यात आल्या आहेत. गारमेंटचे काम ते करतात. खासदार सुप्रिया सुळेंनी त्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यावेळी महिलांनी पोलिस अधीक्षकांचे कौतुक करीत त्यांच्यामुळेच मला आता माझ्या मुलाची, पतीची चिंता नसते. रात्री शांत झोप लागते, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT