plot 
सोलापूर

प्लॉट ले-आउट बनावट मंजुरी प्रकरणी विकसकांवर गुन्हा दाखल ! मात्र पालिकेचे कर्मचारी-अधिकारी मोकाट 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोरेगाव व दहिटणे येथील प्लॉटचे ले-आऊट व विकसन परवा मंजुरीचे बनावट आदेश तयार करून महापालिका व ग्राहकांच्या बनावट ले-आऊट प्रकरणात पालिकेतील अधिकारी-कर्मचारी अद्यापपर्यंत मोकाटच आहेत. पोलिसांच्या तपासामध्ये काही कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा पोलिस तपास करीत आहेत. 

दहिटणे येथील सर्व्हे नं. 34/4अ/3(टीपी) ही जागा यासीन अमीर हमजा मोतीवाला, रफिक अमीर हमजा मोतीवाला, वसीम अमीर हमजा मोतीवाला यांनी तसेच सोरेगाव येथील गट नं. 12/1/ब/7 प्लॉट साई इन्फ्राचे संचालक प्रकाश पाटील, आफताब कल्याणी, रोहित देशमुख यांनी विकसित करण्यासाठी पालिकेत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर नगररचना विभागाकडून मोतीवाला आणि साई इन्फ्रा यांना प्राथमिक मंजुरी मिळाली. यानंतर 17 जानेवारी 2016 ते 27 ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत मोतीवाला आणि साई इन्फ्राच्या संचालकांनी नगररचना कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी यांच्याशी संगनमत करून ले-आऊटबाबत बनावट अंतिम मंजुरी आदेश आणि बनावट विकसन परवाना पत्र तयार करून घेतले. यानंतर ले-आऊटमधील प्लॉट विकण्यास सुरवात केली. यामध्ये महापालिका आणि ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणी विकसकांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विकसकांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. 

विकसकांनी महापालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे बनावट ले-आऊट मंजुरी आदेश व विकसन परवाना पत्र मिळविले, हे उघड सत्य आहे. म्हणूनच तर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु, हे बनावट ले-आऊट मंजुरी आदेश व विकसन परवाना पत्र देणारे कर्मचारी किंवा अधिकारी कोण? याबाबत महापालिकेत सध्या जोरदार चर्चा सुरू असून पोलिस तपासात कोणाकोणाची नावे उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून तपासामध्ये काही कर्मचाऱ्यांची नावे समोर येत आहेत. परंतु, पुरावा हातात आल्यानंतरच या गुन्ह्याशी संबंध असणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 
- सुनील दोरगे, 
पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT