Solapur_Crime 
सोलापूर

मडकी वस्तीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या ! वाचा शहर व परिसरातील गुन्हे वृत्त 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील पुणे रोडवरील मडकी वस्ती येथील दत्ता शंकर पांढरे (वय 55) यांनी राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. पांढरे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना खाली उतरवून बेशुद्धावस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

मानपानावरून महिलेकडून महिलेला मारहाण 
कार्यक्रमातील मानपान देण्याच्या कारणावरून प्रतिभा रतन चिलवेरी हिने स्नेहा रोहित अरकाल (वय 27, रा. पद्मा नगर, अक्‍कलकोट रोड, सोलापूर) या महिलेच्या पोटात लाथा व हाताबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. जखमी स्नेहा यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी जोडबसवण्णा चौकातील श्रीनिवास अरकाल यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर स्नेहा यांची नणंद प्रतिभा हिने मारहाण केली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

धर्मवीर संभाजी तलावात तरुणाची आत्महत्या 
विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावातील पाण्यात उडी मारून आरिफ मुसा कुरेशी (वय 28, रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. तलावातील पाण्यात आरिफ कुरेशी याचा मृतदेह बुधवारी दुपारी पाण्यावर तरंगताना मिळून आल्यानंतर तो बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्या वेळी डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

ट्रकच्या धडकेने छोटा हत्तीमधील सहा जखमी 
पंढरपूर ते कामती जाणाऱ्या रस्त्यावरील गुरुकृपा गॅस एजन्सीसमोर ट्रकने धडक दिल्याने छोटा हत्ती वाहनातील सहाजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. रंजना मनोहर पवार (वय 35), तानाजी मुरलीधर पवार (वय 40), सुमन मुरलीधर पवार (वय 60, सर्व रा. कामती, ता. मोहोळ), जया अरुण ताकमोगे (वय 50, रा. कांदिवली, मुंबई), सविता राजाराम घंदुरे (वय 48, रा. संगमेश्‍वर नगर, अक्‍कलकोट रोड, सोलापूर), मारुती चंद्रकांत शिंदे (वय 38, रा. संगमेश्‍वर नगर, सोलापूर) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT