Solapur_Crime 
सोलापूर

औषध समजून केले विष प्राशन ! वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्त 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : खोकल्याचे औषध समजून दैवता दत्तात्रय शिंदे (वय 54, रा. उत्तर कसबा, चौपाड, सोलापूर) या महिलेने विषारी औषध पिले. यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यावर उपचारासाठी मुलगा संदीप शिंदे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 
म्हेत्रे वीटभट्टीजवळील विहिरीमध्ये पडून श्रीकांत नारायण गायकवाड (वय 33, रा. विजयलक्ष्मी नगर, सोलापूर) या तरुणाने आत्महत्या केली. गायकवाड याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यावर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तो वर काढून शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

घरगुती वादातून तरुणास मारहाण 
घरगुती वादातून राजेश रायसिंग मैनावाले (वय 30, रा. उत्तर सदर बझार, लष्कर, सोलापूर) या तरुणास नळ बाजार चौक येथे सुभाष मन्सावाले व इतरांनी मारहाण केल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेत राजेश यास सीमा बडुरवाले या महिलेने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

ट्रॅक्‍टरची धडक लागून महिलेचा मृत्यू 
शेतात काम करताना ट्रॅक्‍टरची धडक लागून डोक्‍यावरून चाक गेल्याने शारदा दऱ्याप्पा मेसे (वय 60, रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) ही महिला गंभीर जखमी होऊन मरण पावली. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जखमी अवस्थेत शारदा मेसे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

मंदिराला दुचाकी धडकून दोघे जखमी 
समोरून येणाऱ्या वाहनास साईड देत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदिरास धडकून दुचाकीवरील किरण जानकीराम तिरमले (वय 23) आणि चांगू सोपान उबाळे (वय 17, रा. अंबेजोगाई, जि. बीड, सध्या गोटेवाडी, ता. मोहोळ) हे दोघे जखमी झाले. गोटेवाडी ते सूर्यभान माळी यांच्या शेताकडे दुचाकीवरून जाताना हा अपघात झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

पैशाच्या कारणावरून विवाहितेस मारहाण 
पैशाच्या कारणावरून प्रियांका समाधान बनसोडे (वय 26, रा. हत्तीज, ता. बार्शी) या विवाहितेस तिचा नवरा, सासू, सासरे, दीर व नणंद यांनी लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केल्याने तिच्या सर्वांगास मुका मार लागला आहे. त्यामुळे प्रियांका हिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 
अक्‍कलकोट तालुक्‍यातील तोळणूर येथील शरणप्पा ईरप्पा मठपती (वय 24) या तरुणाने राहत्या घरात अज्ञात कारणावरून कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मठपती यास त्रास होऊ लागल्यावर त्याला वडील ईरप्पा मठपती यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गजब बेइज्जती है यार! पाकिस्तानी खेळाडू मैदानात वाट बघत होते, टीम इंडियानं तोंडावर दरवाजा बंद केला; VIDEO VIRAL

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

IND vs PAK : टीम इंडियाचा पवित्रा अन् शोएब अख्तरची रडारड! म्हणाला, तुम्ही राजकारण आणताय, आम्ही बरंच काही बोलू शकतो, पण...

Pune News : गुलटेकडी मार्केटमध्ये ‘जी-५६’ जागांचा गैरवापर, लिलाव वगळून १७ जागांचे केवळ पत्राद्वारे वाटप; प्रशासन मौनात

Nagpur News: नगरधन आठवडी बाजारात भीषण दुर्घटना; मद्यधुंद अवस्थेत गरम तेलाच्या कढईत पडल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT