Solapur_Crime 
सोलापूर

पेट्रोल पंपात गुंतवणुकीचे आमिष दाखवून 28.84 लाखांची फसवणूक ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

तात्या लांडगे

सोलापूर : पेट्रोल पंपात गुंतवणुकीचे आमिष दाखवून नीला चंद्रकांत गताटे (रा. नागणे देशमुख आपार्टमेंट, बुधवार पेठ) यांची 28 लाख 84 हजारांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बारामतीतील तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी संदीप महादेव कदम, मोनिका संदीप कदम (दोघेही रा. न्यू कोर्ट कॉलनी, बारामती) आणि अशोक शेंडगे (रा. बारामती, जि. पुणे) या तिघांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक श्री. भोईटे हे करीत आहेत. 

चोरट्याने रोकड अन्‌ मोबाईल पळविला 
सोलापूर : तेलंगी पाच्छा पेठ, शायना आर्केड अपार्टमेंट येथे राहणारे मोहम्मद युसूफ शफी कुरेशी यांच्या घराच्या उघड्या दारातून प्रवेश करत चोरट्याने मोबाईल व साडेअकरा हजारांची रोकड लंपास केली. अज्ञात चोरट्याविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री. चव्हाण हे करीत आहेत. 

बॅंक खात्यातून परस्पर रक्कम काढली 
बॅंकेच्या खात्यातून परस्पररीत्या पैसे काढून फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सुनीता सूर्यकांत मोहोळकर (रा. ओम नमः शिवाय नगर, होटगी रोड) यांच्या ऍक्‍सिस बॅंक क्रेडिट कार्डमधून चोरट्यांनी फ्लिपकार्ड बेंगलोर, वन मुव्ही विथ सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव, एटीएम वायलेट नोएडा या कंपनीच्या माध्यमातून खात्यातून एकूण 78 हजार 998 रुपयांचा अपहार केला आहे. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहोळकर यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत. 

अवैध वाळू वाहतूक; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त 
वळसंग पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत दोन वाहने ताब्यात घेतली आहेत. शनिवारी (ता. 12) पहाटेच्या सुमारास होटगी येथे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती वळसंग पोलिसांना मिळाली. पोलिस हवालदार रमेज शेख, पोलिस नाईक अमोल यादव, बाबा मुल्ला यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्या वेळी त्यांना दोन वाहने वाळू घेऊन जाताना दिसली. चंद्रकांत शिवाजी भिंगी (रा. स्वागत नगर) आणि मल्लिकार्जुन आप्पासाहेब मेत्रे (रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या ताब्यातील दोन वाहने व पाच ब्रास वाळू जप्त केली. पुढील तपास पोलिस हवालदार श्री. चव्हाण हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT