Solapur_Crime 
सोलापूर

गुन्हे वृत्त : महिलेची साडेचार लाखांची फसवणूक ! रिक्षाचालकाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा 

अमोल व्यवहारे

सोलापूर : घटस्फोटित स्थळ पाहण्याच्या वेबसाईटवरून सोलापुरातील घटस्फोटित महिलेची चार लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीमती संगीता शेषप्पा जिंकले (वय 38, रा. सूत मिल समोर, अक्कलकोट रोड, यशराज नगरी, सोलापूर) या महिलेच्या फिर्यादीवरून देवाशीष जेना, प्रिया शर्मा, राजबाला आणि लुकास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीमती संगीता जिंकले या घटस्फोटित असून त्यांनी 21 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर वधू - वर सूचक मंडळाच्या ऍपवरून संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर देवाशीष जेना व इतरांनी वेळोवेळी जिंकले यांना फोन करून "तुम्हाला गिफ्ट लागले आहे, त्यामध्ये फॉरेन करन्सी आहे, गोल्ड आहे. त्यासाठी पेनल्टी भरावी लागेल' असे सांगून जिंकले यांना वेळोवेळी चार लाख 40 हजार रुपये बॅंक खात्यावर भरण्यास लावून त्यांची फसवणूक केली. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सिद तपास करीत आहेत. 

रिक्षाचालकाला मारहाणप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 
रिक्षा चालकाला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन हरिश्‍चंद्र राठोड (वय 24, रा. घोडा तांडा, ता. दक्षिण सोलापूर) याच्या फिर्यादीवरून रूपेश संजय सोनकवडे व त्याचे मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सचिन राठोड हा सोमवारी रात्री आसरा चौक येथून पॅसेंजर बसवून घोडा तांडाकडे जात होता. त्या वेळी रूपेश सोनकवडे यांनी पॅसेंजर कसे घेतले म्हणून बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर सचिन राठोड हा रिक्षा घेऊन जात असताना रूपेश व त्याच्या तीन मित्रांनी पाठीमागून येऊन रिक्षा अडवून त्यास मारहाण केली. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक लोहार पुढील तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

Palghar News: शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीस सुरुवात, पण पैसे रखडले; बळीराजा आर्थिक अडचणीत

Ajit Kale: हक्काच्या जमिनी मिळेपर्यंत लढणार: ​अ‍ॅड. अजित काळे यांचा इशारा, २० मार्चला आत्मक्लेष आंदोलन!

SCROLL FOR NEXT