Crime news in and around Solapur city 
सोलापूर

महिलेच्या बॅगमधील अडीच लाखांचे दागिने लंपास ! फसवणुकीच्या घटनांमध्ये होतेय वाढ

अमोल व्यवहारे

सोलापूर : ऑटोरिक्षा व बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगमधील 2 लाख 37 हजार 750 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तो मुरूम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत श्रीदेवी राहुल पाटील (वय 27, (रा. बजरंग नगर, मजरेवाडी, सोलापूर) या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

श्रीदेवी पाटील यांच्या मूळ गावी मुरूम येथे देवकार्य असल्याने 21 डिसेंबर रोजी त्या व आई-वडील, मुले हे गावी गेले होते. त्यावेळी शेळगी, सोलापूर ते मुरुम असे ऑटोरिक्षा व बसमधून प्रवास करीत पाटील या गावी गेल्या. या प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने लाल रंगाच्या प्रवासी बॅगमधून ज्वेलर्स बॉक्‍समध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यामध्ये सोन्याचे गंठण, मिनी गंठण, कानातील रिंग व कर्णफुले, पिळ्याची अंगठी, चांदीचे पैंजण असा ऐवज होता. 

महिलेकडून फसवणूक
 
कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून 50 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिध्दलिंग चंद्रकांत दापुरे (वय 39, रा. ज्योती नगर, आकाशवाणी केंद्राजवळ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुयरी तुषार गोसराणी या महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक्‍साईड फायनान्स कंपनीमधून शुन्य टक्‍के व्याजाने कर्ज मिळेल असे सांगून सिध्दलिंग दापुरे यांना फोनवरून सांगून त्यांना 50 हजार रुपये बॅंक खात्यावर भरण्यास लावले. या बाबत श्री. दापुरे यांना शंका आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद केली. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत. 

रोख व दागिने घेऊन फसवणूक 

महिलेचा विश्‍वास संपादन करून तिच्याकडून रोख 75 हजार रुपये व एक तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास करणाऱ्याविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पद्मावती विजय कदम (वय 36, रा. ज्ञानेश्‍वर नगर, जुळे सोलापूर) या महिलेच्या फिर्यादीवरुन स्वप्नील गायकवाड (रा. भारती विद्यापीठसमोर, सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील गायकवाड याने त्याच्या घरगुती अडचणी सांगून पद्मावती कदम यांच्याकडून वेळोवेळी 75 हजार रुपये व दोन अर्ध्या तोळ्याच्या अंगठ्या घेतल्या होत्या. त्या कदम यांनी परत मागितल्या असता गायकवाड याने देण्यास टाळाटाळ केली. महिला पोलिस उपनिरीक्षक मोरे-पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

Latest Marathi News Live Update: कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षकांचा बीड दौरा

दुष्काळी दौऱ्याच्या गर्दीवर डोळा; लुटीचा डाव भोकरदन पोलिसांनी २४ तासांत उधळला!

SCROLL FOR NEXT