Solapur_Crime 
सोलापूर

ठाणे येथून भांडी खरेदीसाठी सोलापुरात आलेल्या महिलेचे दागिने पळविले ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

तात्या लांडगे

सोलापूर : ठाणे येथून सोलापुरात आलेली महिला आपल्या मुलीसोबत भांडे गल्ली (मधला मारुती) येथील माशाळ यांच्या भांड्याच्या दुकानासमोर भांडी खरेदीसाठी उभ्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून आईच्या पिशवीतून 47 हजार रुपयांचे दागिने आणि साडेतीनशे रुपयांची रोकड चोरुन नेल्याची फिर्याद अश्‍विनी विठ्ठल शिंदे (रा. ग्रीन व्हिलेज, काशीमिरा, मीरा रोड, ठाणे) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला आहे. 

दरवाजा तोडून दागिने लंपास 
सोलापूर : आकाशवाणी परिसरातील नरसिंगराव परशुराम फटाले यांच्या घराचा दरवाजा व कुलूप तोडून चोरट्याने घरातील 34 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घराचा मुख्य दरवाजा व कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करुन कपाटातील नऊ हजार रुपयांचे चांदीचे दागिने व 25 हजारांची रोकड लांबविली आहे. या प्रकरणी फटाले यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

दवाखान्यात गेल्यावर 12 हजारांच्या साहित्याची चोरी 
लहान मुलीस त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी महादेवी रमेश बनसोडे (रा. झोपडपट्टी क्र. एक, जुना विजापूर नाका) यांची मुलगी घराला कुलूप लावून बाहेर गेली. ही संधी साधून चोरट्याने घराच्या उत्तरेकडील बाजूचा पत्रा कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने दहा हजार रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी महादेवी बनसोडे यांनी विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली. 

घातक दारू तयार केल्याप्रकरणी तरुणास उच्च न्यायालयातून जामीन 
मानवी शरीरास अपायकारक अशी दारू तयार केल्याच्या आरोपावरून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहन अंबादास चव्हाण (रा. शिवाजी नगर तांडा, अक्कलकोट) याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधीश सी. व्ही. भडंग यांनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. अक्‍कलकोट पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक गजानन गायकवाड यांनी दारु अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी हा अड्डा मोहन चव्हाणचा असल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले. त्या आधारे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर ऍड. जयदीप माने यांच्या माध्यमातून चव्हाण याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. सुनावणीवेळी ऍड. माने म्हणाले, घटनास्थळावरुन पळून गेलेला व्यक्‍त हा मोहन चव्हाण नसून, त्याबद्दल पोलिसांनी कोणाकोणाकडे चौकशी केली, याचा उल्लेखही फिर्यादीत नाही. तो युक्‍तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने चव्हाणला अटकपूर्व जामीन मंजूर केला. याप्रकरणी ऍड. सत्यव्रत जोशी यांनी तर सरकारतर्फे ऍड. वाय. एस. नाखवा यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Donald Trump: भारताबाबत आक्षेपार्ह विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती; 'महान देश' म्हणत केलं कौतुक...

Government Employees : शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तीव्र; चौथ्या दिवशीही कामकाज ठप्प, सुधारित पेन्शनसह १८ मागण्यांवर तोडगा नाही

Nanded Forest News: सागवानी लाकूड तस्करीवर जलधारा वनविकास महामंडळाची धडक कारवाई; टेम्पोसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत

SCROLL FOR NEXT