सोलापूर : विजयपूर रोडवरील ओमगर्जना चौक (रोहिणी नगर) येथील सना यांचा 23 डिसेंबर 2020 रोजी उमर फारूक शेख यांच्याशी झाला. विवाहानंतर 15 दिवसांतच त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि 14 मार्च रोजी त्यांचा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोचला. सना व उमर यांनी परस्परविरोधात विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली असून, दोघांनीही जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.
विवाहानंतर सासरच्यांनी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ सुरू केली. पैसे न दिल्यास तुला फाशी घ्यावी लागेल, अशी धमकीही दिली. आई - वडील, भाऊ - बहीण मिळून मला सासरी सोडण्यासाठी आले. त्या वेळी सासरकडील लोकांनी सर्वांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच "तुम्ही पुन्हा आमच्या घरी आलात तर तुमचे तुकडे करून टाकीन', अशी धमकीही दिल्याचे सना शेख यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून उमर शेख (पती), बिलाल शेख, यासिन शेख (दीर), करिमा शेख (सासू), करिष्मा बिलाल शेख (जाऊ), तबस्सुम यासिन शेख (मोठी जाऊ), शकिला हाफीज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. वाल्मीकी हे करीत आहेत.
दुसरीकडे सना, शेकुम्बर पटेल, हसिना शेख, अझहर शेख, सानिया शेख यांच्यासह अन्य पाचजणांनी हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. विवाहाचा खर्च म्हणून दहा लाखांची मागणी केल्याची फिर्याद उमर शेख यांनी दिली आहे. या भांडणात वहिनीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. याचा तपास पोलिस नाईक श्री. माडे हे करीत आहेत.
मारहाण करून पाचजणांनी चोरला दागिन्यांसह 27 हजाराचा मुद्देमाल
ऊसतोडीच्या टोळीसोबत चुलत भाऊ दारासिंग वडजे (रा. मार्डी) यांना बोलण्यासाठी कविता बाबा राठोड (रा. आनंद नगर तांडा, लोहारा, जि. उस्मानाबाद) या जुना तुळजापूर नाका याठिकाणी थांबल्या होत्या. त्या वेळी गणेश बाळू धुमाळ याने तुम्ही इथे का थांबलात म्हणून शिवीगाळ करून भांडण सुरू केले. त्याने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून मारहाण केली. गळ्यातील मंगळसूत्र जबदरस्तीने हिसकावून ट्रॅक्टर चालकाच्या खिशातील दहा हजार रुपये व ऊसतोड कामगार आकाश चव्हाण याच्या खिशातील मोबाईल काढून घेतल्याची फिर्याद कविता राठोड यांनी दिली. त्यानुसार धुमाळ, सुरेश बिन्ना भोसले, पप्पू भीमा धुमाळ (रा. तळेहिप्परगा) यांच्यासह दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. मांजरे हे करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.