Solapur_Crime
Solapur_Crime 
सोलापूर

पत्नीसाठी जावयाने केला सासरा व मेव्हण्याला पेटविण्याचा प्रयत्न ! वॉशिंग मशिनसाठी विवाहितेचा छळ 

तात्या लांडगे

सोलापूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जावयाने सासरी जाऊन सासरा व मेव्हण्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी योगेश महादेव घोगरे (रा. माकडाची उपळाई, जि. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

होटगी रोडवरील राजेश किसन सावंत (रा. बेडर कन्हैया नगर, मुलतानी बेकरीजवळ) यांच्या मुलीचा विवाह योगेशसोबत झाला होता. दरम्यान, मुलगी शिक्षण घेत असल्याने ती माहेरीच राहण्यास होती. महाविद्यालयाच्या सुट्यांमध्ये ती सासरी जात होती. दरम्यान, फिर्यादी राजेश यांची मुलगी सासरी नांदण्यास असताना योगेश हा मुलीवर संशय घेऊन शिवीगाळ करीत होता. त्यानंतर राजेश यांची मुलगी माहेरी आली. त्या वेळी योगेश हा फोन करून शिवीगाळ करून, तुमच्या मुलीस नांदविण्यास पाठवून द्या, असे म्हणत होता. फिर्यादी राजेश यांनी दिवाळीचा सण असल्याने तो झाल्यावर पाठवून देतो म्हणून सांगितले. मात्र, योगेशने न ऐकता सासरी येऊन मुलांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच गळा दाबून जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न केला. योगेशने त्याच्यासोबत आणलेल्या डब्यातील पेट्रोल माझ्या व मुलांच्या अंगावर टाकून पेटवून देण्याचाही प्रयत्न केला, असेही राजेश यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत. 

वॉशिंग मशिन न दिल्याने विवाहितेचा छळ 
लग्नामध्ये वॉशिंग मशिन न दिल्याने विवाहितेचा छळ करीत माहेरून 15 लाख रुपये घेऊन ये म्हणून त्रास दिल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्ताक मेहमूदखान पठाण, कौसर मेहमूदखान पठाण, मेहमूदखान खाजाखान पठाण, आदिल महमूदखान पठाण, फरहत मेहमूदखान पठाण (सर्वजण रा. परंडा, जि. उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

अंजुम मुस्ताक पठाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली. अंजुम यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सासरकडील मंडळींनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. काळे हे करीत आहेत. 

डोक्‍यात दगड घालून वृद्धास लुटले 
विजयपूर रोडवरील एसआरपीएफ कॅम्प परिसरातील अर्जुन तुकाराम लेंडवे या 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्‍यात दगड घालून आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची चेन हिसकावून काढून घेतल्याप्रकरणी दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी 11.15 च्या सुमारास घडली. 

लेंडवे हे विश्रांतीसाठी एसआरपीएफ कॅम्प परिसरात बसले होते. त्या वेळी दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने लेंडवे यांच्या डोक्‍यात दगड घातला व चाकूचा धाक दाखविला. दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. खिशातील एक हजार 300 रुपयेही काढून घेतल्याचे लेंडवे यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मुलाणी हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT