2sakal_20breaking.jpg 
सोलापूर

फेसबूकवरील पोस्ट ! कोरोना विनाकारण टेस्ट केल्यास रिपोर्ट येईल पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाची टेस्ट करायच्या भानगडीत पडू नका, नाहीतर विनाकारण चांगले असतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, अशी पोस्ट फेसबूकवरुन व्हायरल करणाऱ्या सोलापुरातील सचिन जन्मले (वय-40) याच्याविरुध्द जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापूरचे पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी सोशल मिडियावर नजर ठेवण्यासाठी सायबर सेलमध्ये स्वतंत्र कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. नियिमतपणे आक्षेपार्ह पोस्टवर त्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत सोलापुरातील चार जणांविरुध्द अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता. 14) सायंकाळी सातच्या सुमारास जन्मले याने स्वत:च्या फेसबूक अकाउंटवर एक पोस्ट व्हायरल केली. त्यामध्ये त्याने कोरोनाची टेस्ट विनाकारण कोणीही करु नये, अन्यथा चांगले असतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, असे त्यात नमूद केले होते. पोलिसांनी ती पोस्ट काढून टाकली असून जन्मले याला ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्याला एक महिन्याचा तुरुंगवास तर दोनशे रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली जाईल, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. 

24 तासांत 64 जणांविरुध्द गुन्हे 
कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी म्हणून पोलिस आयुक्‍तांनी सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत आठ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. त्यामध्ये मागील 24 तासांत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 63 तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघनप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये फौजदार चावडी पोलिसांनी 27, जेलरोड पोलिसांनी 12, विजापूर नाका पोलिसांनी 14, सलगर वस्ती पोलिसांनी एक, एमआयडीसी पोलिसांनी नऊ जणांविरुध्द गुन्हे दाखल केल्याचे पोलिस आयुक्‍तालयाने सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी नवी मोकळी जागा! ५०० एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करणार; राज्य सरकारची दमदार घोषणा

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

Latest Marathi News Live Update: पीएम मोदी यांनी गोव्यात गोकर्ण पर्तगाळी मठाच्या 555व्या वर्धापनदिन सोहळ्यात केले भाषण

SMAT 2025: १ चौकार, १ षटकार मारला, पण वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला, संघही ११२ धावांत ढेपाळला

Explained: च्यवनप्राशमधील आयुर्वेदिक घटक शरीराला कसे देतात ताकद? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT