Crime News esakal
सोलापूर

Solapur : तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पुण्यातील तरुणाविरोधात गुन्हा

मृत तरुणी ही पाच महिन्यांची गरोदर असताना संशयित तरुणाने लग्नास नकार दिला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील धर्मवीर संभाजी तलावात एका तरुणीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पुणे येथील एका तरुणाविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

29 ऑक्टोबर रोजी एक पंचवीस वर्षीय तरुणीने शहरातील धर्मवीर संभाजी तलावात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेचा तपास सुरू असताना आत्महत्या करणाऱ्या तरुणीची ओळख पटली.

तेव्हा मृत तरुणीच्या आईने सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार, मृत तरुणी ही पुणे येथे नोकरी करीत होती. तेथे या तरुणीचा संबंध एका तरुणाशी आला. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले.

मृत तरुणी ही पाच महिन्यांची गरोदर असताना संशयित तरुणाने लग्नास नकार दिला. या प्रकारातून तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केली. यावरून संशयित स्वप्नील बंडे (रा. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस अधिकारी श्री. माळी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचे कुणाल शाह व्हॉट्सअ‍ॅपचे बॉस बनणार! ग्लोबल हेडपदी नियुक्ती; मेटाचा मोठा निर्णय, वाचा शाह नेमके आहेत कोण?

Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

Pune Expansion: पुणे महापालिकेला २३ गावांच्या विकास आराखड्याला हिरवा कंदील; पीएमआरडीएचा वादग्रस्त आराखडा रद्द

SCROLL FOR NEXT