Keshav Upadhyay sakal
सोलापूर

Keshav Upadhyay : काँग्रेसच्या आश्वासनांचा कागदी पेटारा ; भाजपचे प्रदेश प्रवक्ते उपाध्येंची टीका ,भाजपची मात्र मोदी गॅरंटी

मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी शेतीसाठी मोफत विजेची घोषणा केली होती. मात्र, नंतर त्याची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांची फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी शेतीसाठी मोफत विजेची घोषणा केली होती. मात्र, नंतर त्याची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे काँग्रेसच्या आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा असतो, अशी टीका करीत भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाजपने दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केल्याने ती मोदींची गॅरंटी असल्याचे सांगितले.

शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सोलापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. या आधी काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांचा यंदाचा जाहीरनामा अपयशाचे प्रतिबिंब असल्याची टीका करीत उपाध्ये म्हणाले, काँग्रेसने २००४ मध्ये मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी शेतीसाठी मोफत विजेची घोषणा केली होती. त्यानंतर शून्य वीजबिलाचे फोटो प्रसिद्ध झाले होते. काही दिवसांनी थकबाकीसह बिले आल्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छपाईची चूक असल्याचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांची थट्टा केली होती. मात्र, भाजप शेतकऱ्यांबाबत संवेदनशील आहे.

काँग्रेसने अनेक वर्षे दडवून ठेवलेला स्वामिनाथन आयोगाचा अहवाल मोदी सरकारने स्वीकारला आहे. २००६ ते २००४ या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. काँग्रेसच्या विकासाकडे दुर्लक्षाच्या नीतीचे परिणाम देशाला भोगावे लागले. मात्र, काँग्रेसच्या सहा दशकांतील समस्या मोदी सरकारने दहा वर्षांत संपविल्या.

कोर्टाच्या निर्णयाने सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश व ईडीची कारवाई याचा परस्पर संबंध नाही. देशात केवळ तीन टक्के लोकप्रतिनिधींवर कारवाई झाल्याचे खुद्द पंतप्रधानांनीच स्पष्ट केले आहे. ती यंत्रणा दोषींवर कारवाई करेल. तसेच आणीबाणी लादणाऱ्या, शहाबानो प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर घटनेची मोडतोड करणाऱ्या काँग्रेसला संविधानाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. चारशे पारची घोषणा पूर्ण करण्यासाठी जनता मोदींच्या विकसित, समृद्ध भारताच्या स्वप्नाला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस भाजपचे शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, माजी सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, योगेश कबाडे उपस्थित होते.

कष्टकऱ्यांच्या शहराशी नाळ जोडणारा उमेदवार

काँग्रेसच्या राज्यात अदानी, अंबानींचे प्रकल्प नाहीत का?, असा सवाल उपाध्ये यांनी एका प्रश्नावर केला. तसेच ही काँग्रेस नव्हे, भाजपमध्ये घराणेशाहीची परंपरा नसल्याचे सांगून ते म्हणाले, सोलापूर हे कष्टकऱ्यांचे शहर आहे. आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून त्याच्याशी नाळ जोडणाऱ्या तरुणाला उमेदवारी दिल्याचेही त्यांनी म्हटले.

घरे आम्ही बांधली, मात्र श्रेय दुसऱ्यांना

माजी आमदार नरसय्या आडम हे कम्युनिस्ट पक्षाचे आहेत. तरीही आम्ही राजकीय विचार दूर ठेवून घरे बांधली. मात्र, ते श्रेय घेत आहेत. ते दुसऱ्यांना समर्थन देत असल्याचे उपाध्ये यांनी म्हटले.

हिंदू समाजाबद्दल द्वेष

हिंदू दहशतवादाच्या वक्तव्याविषयी भाजप प्रोपोगंडा करत असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले होते. त्या प्रश्नावर उपाध्ये यांनी प्रोपोगंडा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. सहिष्णू, सर्व मतांबद्दल आदर बाळगणाऱ्या हिंदू समाजाविषयी त्यांच्या मनात घृणा, द्वेष होता. त्याविषयी हिंदू जनमनातून संताप व्यक्त झाल्याचे त्यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT