3Survey_0_0.jpg 
सोलापूर

पिक विमा योजने केली शेतकऱ्यांची निराशा : शंभर टक्‍के नुकसान होऊनही केवळ एक टक्क परतावा 

अरविंद मोटे


सोलापूर : अतिवृष्टीत नुकसान होऊनही पिक विमा योजनेअंतर्गंत मिळणारा परतावा अत्यंत तोकडा आहे. बार्शी तालुक्‍यातील एका शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान होऊनही केवळ एक टक्का परतावा दिल्याने विमा कंपनी व जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे. 

श्रीपतपिंपरी (ता. बार्शी) येथील युवराज गरदडे, बालाजी गरदडे आणि सोमा गरदडे या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून त्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान होऊनही केवळ एक टक्केच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा, मका, सोयाबिन अशा पिकांचे अतिरिक्‍त पावसामुळे शंभर टक्के नुकसान झाले. सर्व पिके पाण्याखाली जाऊन पिके बुडाली. यावेळी विमा कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले नाहीत. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून विमा कंपनीकडून सर्व्हे होणे आवश्‍यक होते. महसूल खात्याकडून झालेले सर्व्हे अमान्य करत विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. 

याबाबत आंदोलन करणारे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून प्रतिवर्षी सर्व पिकांचे विम्याचे हप्ते शेतकरी जमा करत आहेत. जेव्हा नुकसान होते तेव्हा मात्र विमा कंपनी व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दर्लक्ष केले जात आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विमा कंपनी विम्याच्या हप्त्याच्या रुपाने शेतकऱ्यांचे पैसे विमा कंपनी जमा करत आहे. त्याबरोबरच राज्य व केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येकी 33 टक्के वाटा उचलत आहेत. असे असतानाही जेव्हा नुकसान होते, तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT